कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी दैवज्ञ गणपती मंदिरात कलशारोहण सोहळा

02:33 PM Jan 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांच्या हस्ते ३१ रोजी होणार कलशारोहण

Advertisement

सावंतवाडी

Advertisement

श्री देव दैवज्ञ गणपती मंदिराच्या ३५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून दैवज्ञ समाजाचे गुरु श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा आयोजित केला आहे. तसेच माघी गणेश जयंती, नारायण स्वामी पुण्यतिथी व बालाजी उत्सव साजरा करण्यात येणार आहे.या निमित्त खालील कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. गुरुवारी ३० जानेवारीला सकाळपासून धार्मिक विधी, सायंकाळी सहा वाजता सावंतवाडी नगरपालिकाकडून विठ्ठल मंदिररोड ते गणपती मंदिर अशी मिरवणूक असणार आहे.शुक्रवार ३१ रोजी सकाळी ८ ते १० श्रीदेव सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजी यांच्या शुभहस्ते पंचांगहोम, बलिदान, पूर्णाहुती, आरती. शनिवारी १ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त सकाळी ८ वा. श्रींची पूजाअर्चा, अभिषेक, सकाळी १०.३० वा. श्री गणेश जन्मावर प्राकारशुद्धी आवाहित देवता पूजन, प्रधानहोम, स. कीर्तन, दुपारी १२ वा. श्री गणेश जन्म, १२.३० १० वाजून २० मि. कलशप्रतिष्ठा श्री पासून श्री गणेश नामजप, रात्री ८ वा. भजन रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वा. नारायण स्वामींच्या पुण्यतिथी श्रींची पूजाअर्चा व तदनंतर स्वामींच्या समाधी व पादुकांचे पूजन, स. ११ वा. पावणी, दुपारी १ वा. महाप्रसाद, रात्री ८ वा. भजन, सोमवार ३ फेब्रुवारीला सकाळी ८ वा. श्री बालाजी मठात श्रींची पूजाअर्चा तदनंतर स्वामींच्या समाधी व पादुकांचे पूजन व अभिषेक, रात्री ८ वा. भजन. या सर्व कार्यक्रमास बेळगाव, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व दैवज्ञ बांधवांनी उपस्थित राहून माघी गणेश जयंती उत्सवाचा आणि श्री श्री सच्चिदानंद ज्ञानेश्वर भारती महास्वामीजीचा आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त दैवज्ञ ब्राह्मण समाज सावंतवाडी, दैवज्ञ गणपती मंदिर अध्यक्ष शिवशंकर नेरूरकर आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुवर्णकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश पनवेलकर यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update # news update
Next Article