For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

थेट पाईपलाईनच्या पाण्याने अंबाबाईला जलाभिषेक !

04:00 PM Nov 12, 2023 IST | Kalyani Amanagi
थेट पाईपलाईनच्या पाण्याने अंबाबाईला जलाभिषेक
Advertisement

कोल्हापूर/ संग्राम काटकर

Advertisement

तब्बल साडेचार दशकांच्या प्रतिक्षेनंतर कोल्हापूरात आलेल्या काळम्मावाडी थेट पाईपलाईनच्या पाण्याने करवीर निवासिनी अंबाबाईला जलाभिषेक करण्यात आला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला केलेहा हा जलाभिषेक एकदा नव्हे तर दोन झाला. सकाळी साडे आठ व साडे अकरा वाजता अंबाबाईच्या पुजेवळी केलेल्या या जलाभिषेकाने थेट पाईपलाईनला सत्यात आणण्यासाठी कोल्हापुरातील ज्यांनी ज्यांनी अपार प्रयत्न केले, ते सार्थकी लागल्याची भावना सोशल मीडियावर उमटली. दिलेल्या शब्दात जागत थेट पाईपलाईनने पाणी कोल्हापुरातील पुईखडी येथे आणण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्या आमदार व विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांच्यावर तर सोशल मीडियाद्वारे स्तुतीसुमनांचा अक्षरश: वर्षाव करण्यात आला.

कोल्हापूरवासियांच्या दृष्टीने जिव्हाळयाची बनलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन ही योजना गेली चार दशके दिरंगाई, आरोप-प्रत्योरोप, निधीची कमरता, राजकीय दुर्लक्ष यासह बऱ्याच कारणांनी गाजत राहिली होती. माजी पालकमंत्री व आमदार सतेज पाटील मात्र योजनेत व्यक्तीशा लक्ष घालून योजनेला पूर्णत्वाला नेण्याबरोबरच यंदाच्या दिवाळीला अभ्यंगस्नानासाठी काळम्मावाडीचे पाणी देणारच, असा शब्द समस्त कोल्हापूरकरांना दिला होता. दिलेल्या शब्दाला जागताना त्यांनी कोणत्याही परिस्थितीत काळम्मावाडीचे पाणी थेट पाईपलाईनने पुईखडीवर कसे येईल, याचे चोख नियोजन पेले. नियोजनानुसार शुक्रवारी रात्री पाणी आले आणि पाण्यासोबत कोल्हापुरात आनंदाची लहरही आली. शिवाय अनेक वर्षापासून कोल्हापुरातील जनमाणसांनी पाहिलेले स्वप्नंही साकार झाल्याची भावनाही उमटली. ज्येष्ठ विचारवंत कै. एन. डी. पाटील, कॉम्रेड कै. गोविंद पानसरे, शेतकरी कामगार पक्षाचे कै. विष्णूपंत इंगवले यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते यांनी आपल्या आयुष्यातील बरीच वर्षे कोल्हापूरात काळम्मावाडी थेट पाईपलाईनने पाणी आणण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना योजनेच्या स्वप्नपूर्तीवेळी विसरता येणार नाही.

Advertisement

असे असले तरी आमदार सतेज पाटील यांनी थेट पाईपलाईनने कोल्हापूरात पाणी आणण्यासाठी केलेले विशेष प्रयत्न अधोरेखित झाले आहेत. शुक्रवारी रात्री पुईखडी येथे पाणी आल्यानंतर सतेज पाटील यांच्यासह आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते त्याचे पूजन करण्यात आले. शिवाय पाण्याला कलशात घेऊन ते अंबाबाई मंदिराच्या महाद्वारावर आणले गेले. यानंतर सतेज पाटील, जयश्री जाधव यांच्या हस्ते महाद्वाराच्या पायरीवर पाणी अर्पण करत अंबा माता की जय अशा घोषणा दिल्या. शनिवारची सकाळ झाल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनीही एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करत सतेज पाटील यांच्या नावाने जयजयकार केला. काँग्रेसचे कार्यकर्ते पप्पू पाटील यांनी थेट पाईपपाईनचे पाणी साठवलेल्या एक कलश सकाळी अंबाबाई मंदिरातील पुजाऱ्यांकडे दिला. पुजाऱ्यांनी या कलशातील पाण्याने सकाळी साडे आठ व साडे अकरा वाजताच्या पुजेवळी अंबाबाईला जलाभिषेक केला. अन्य कलश अंबाबाई मंदिराच्या आजूबाजूच्या देवदेवतांच्या मंदिरांना देण्यात आले. मंदिरांनीही कलशांचे पुजन करुन देवदेवतांना जलाभिषेक कऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सोशल मीडियावर उमटलेल्या भावना..

-दिवाळीची सतेज भेट...कोल्हापूरला पाणी थेट
-सतेज पाटील यांना सलाम...
-जे नियतीला, जनतेला मान्य आहे, तेच सतेज पाटील यांनी करुन दाखवले
-पाणी थेट सतेज पाटील साहेब ग्रेट
-40 वर्षांपासून कोल्हापूरकारांनी पाहिलेले स्वप्न अखेर साकारले, कोल्हापूरकरांनो आनंदोत्सव साजरा करा

Advertisement
Tags :

.