काळम्मावाडी धरणातून ९८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरुच! दूधगंगा नदी संलग 10 व्या दिवशी धोक्याच्या पातळी बाहेर
अनेक दिवस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यात चिंता
सरवडे प्रतिनिधी
काळम्मावाडी धरण परिक्षेत्रात अजूनही संततधार पावसाची सुरूच आहे. धरणातील पाणी साठा वाढत असल्याने धरण परिचलन सूचीनुसार पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी आज देखील चार वाजता धरणातून ९८०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग दूधंगगा नदीपात्रात कायम आहे. नदी पात्र सलग दहाव्या दिवशीही धोक्याच्या पातळी बाहेर वाहत आहे .
आज धरण परिसरात ८ तासात ३४ मिलिमीटर पाऊस झाला असून आज अखेर ३०३० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे परिणामत धरणाची पाणीपातळी ६४३.३६ मीटर असून पाणीसाठा ६३१.४३६ द ल घ मी .२२.२९ टि एम सी म्हणजेच ८७.८० टक्के धरण भरलेले आहे .
धरणाच्या पाच वक्रकार दरवाजाच्या सांडव्यावरून ८३०० क्यूसेक्स तर जलविद्युत केंद्रातून १५०० क्यूसेक्स असे एकूण ९८०० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाण्याचा विसर्ग कायम असल्याने नदीकाठावरील शेतीबरोबर काही गावातील घरांनाही धोका निर्माण झाला आहे. याचबरोबर या नदी पात्रावर असणारे जवळपास सात बंधारे ही गेले दहा दिवस पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.