For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

श्रीशिव मोदगेकरला ‘कलमेश्वर श्री’

11:45 AM Apr 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
श्रीशिव मोदगेकरला ‘कलमेश्वर श्री’
Advertisement

सुळेभावी ग्रामस्थ आयोजित कलमेश्वर श्री पंचक्रोशी टॉपटेन स्पर्धा

Advertisement

बेळगाव : बेळगाव जिल्हा शरीरसौष्ठव संघटना व सुळेभावी ग्रामस्थ आयोजित कलमेश्वर श्री पंचक्रोशी मर्यादित टॉपटेन स्पर्धेत निलजीच्या श्रीशिव मोदगेकरने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर ‘कलमेश्वर श्री’ हा मानाचा किताब पटकाविला. सुळेभावीच्या सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे महालक्ष्मी मंदिराचे देवण्णा बंगेन्नावर, मारुती कलभार, परशराम कबालपूर, द्यामण्णा मुरारी, सिद्राय कुडोली, गंगाप्पा कुडोली, पुरस्कर्ते अप्पय्या शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते महाबली हनुमान मूर्तीचे पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. गावमर्यादित स्पर्धेत जवळपास 40 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता.

निकाल पुढीलप्रमाणे

Advertisement

1) श्रीशिव मोदगेकर- निलजी 2) राहुल धनजी-मोदगा 3) जीवन विजापूर-सुळेभावी 4) विनायक तारके-मुतगा 5) राजकुमार मोटरे-मुचंडी 6) योगेश भडगावी-खणगाव 7) सुरज कोकीतकर-सांबरा 8) शुभम हुंदरे-सांबरा 9) रोहित धनजी-मोदगा.

स्पर्धेनंतर प्रमुख पाहुणे कल्लाप्पा चौगुले, सचिन मंडू, कांतू लखनगौडा, गंगय्या पुजारी, नागेश चौगुले, नागेंद्र मंडू, रवी मिसाळे, मारुती बंगन्नवर, विशाल पाटील, गौरांग गेंजी, हरिष मेलगे, सुरेश मारिहाळ, मल्लाप्पा बंगन्नवर यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तर अजित सिद्दण्णवर, एम. गंगाधर, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनील पवार, आकाश हुल्लीयार, गजानन हंगिरगेकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.

Advertisement
Tags :

.