कळंबा फिल्टर हाऊसच्या टाकी वॉश आऊटच्या पाण्याचा टॅंक अजूनही नादुरुस्त
उपनगर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रकार आणला उघडकीस
कोल्हापूर
कळंबा फिल्टर हाऊसच्या टाकी वॉश आऊटच्या पाण्याचा टॅंकच्या दुरुस्तीचे काम करुनही काही उपयोग झालेला नाही. पाईपलाईन गळती आणि इतर ठिकाणचे पाणी रस्त्यावर आल्याने अनेकदा रस्ते खराब होऊन खड्डे पडल्याचे प्रकार वारंवार होत आहेत. मात्र टाकी वॉश आऊट केलेला टँकरच्या दुरावस्थेमुळे पाण्याचे मोठे लोट रस्त्यावरून पसरून रस्ता खराब होत आहे. अशी स्थिती संभाजीनगर ते आयसोलेशन मार्गावरील निर्माण चौक येथील आहे. या चौकात पाणी रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणावर खड्डे पडून वाहनधारकांची कसरत होत आहे . लवकरात लवकर वॉश आउट टँकरच्या काम झालं नाही तर नागरिकांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा उपनगर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. हा सर्व प्रकार उपनगर कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी उघडकीस आणला आहे.
संभाजीनगर ते सायबर रिंग रोडवर निर्माण चौकात गेल्या सहा महिन्यापासून मुख्य रस्त्या शेजारील गटारीची दुरावस्था झाल्याने कळंबा फिल्टर हाऊस मधील टाक्या वॉश आउट नादुरुस्त असल्यामुळे येणारे पाणी गटारीतून जवळ बाहेर पडल्याने ते पाणी आयसोलेशन ओढ्यापर्यंत वाहत असते. या पाण्यामुळे निर्माण चौक येथे रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. याबाबत संबंधित विभागाला नागरिकांनी वेळोवेळी माहिती देऊनही त्या विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. अनेकदा या चौकात संभाजीनगर चौकामध्ये रस्त्यावर येणाऱ्या पाण्यामुळे पुन्हा खड्डे पडल्याने चौक धोकादायक स्थिती आहे, असेही या समितीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
निर्माण चौकातील वाहतूक भरधाव असते. विद्यार्थी, महिलांना चौक पार करताना इतरांची मदत घ्यावी लागते. खड्डयामुळे धोकादायक स्थिती आहे. पाण्याच्या टाक्या धुतल्यानंतर पाणी रस्त्यावर वाहत असते. गटारींची डागडुजी करावी. यावेळी निवास भोसले, राहुल चौधरी, प्रसाद साळोखे, शीतल नलवडे आदी महानगरपालिकेचे पदाधिकारी उपस्थित होते.