कळंबा उपसरपंचपदी वैशाली टिपुगडे बिनविरोध
कळंबा : प्रतिनिधी
कळंबा (ता. करवीर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वैशाली दिलीप टिपुगडे यांची बिनविरोध निवड झाली. कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक निर्णय अधिकारी गुरुप्रसाद कमलाकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. मावळते उपसरपंच विकास पोवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. या रिक्त जागी नूतन उपसरपंच पदासाठी अर्ज मागवले होते. वैशाली टिपुगडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ग्रामपंचायतीवर गेली पंधरा वर्षे राष्ट्रीय काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. कळंबा गावच्या सरपंच सुमन गुरव यांच्या अध्यक्षतेखाली रोटेशन पद्धतीने उपसरपंच पदी निवड दर तिन महिन्याला केली जाते. तसेच नुतून उपसरपंच वैशाली टिपुगडे बोलताना म्हणाले गावच्या मूलभूत समस्यांच्या निराकरणासाठी सर्वांना सोबत घेऊन काम केले जाईल, अशी वैशाली टिपुगडे यांनी सत्काराला उत्तर देताना दिली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उदय जाधव, रोहित मिरजे, संदीप पाटील, रोहित जगताप, नितीश शिंदे, स्वरूप पाटील, दीपक तिवले, स्नेहल जाधव, भाग्यश्री पाटोळे, पूनम जाधव, छाया भवड, मिना गौड, दिपाली रोपळकर, आशा टिपुगडे, संगीता माने उपस्थित होते. त्यांच्या निवडीनंतर समर्थकांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी केली.