गळफास घेवून सेंट्रिंग कामगाराची आत्महत्या; कळंब्यातील घटना
प्रतिनिधी / कळंबा
येथील छ. संभाजी गल्लीत राहणाऱ्या एकाने गळफास घेवून आत्महत्या केली. संभाजी गणपती निकम (वय ५९) असे त्यांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की संभाजी निकम हे गेली सेंट्रिंग काम करत होते. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुणाला न सांगता राहत्या घराच्या माळयावरील खोलीमध्ये गेले. व त्यांने खोलीतील लोखंडी पाईपला रेशमी नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना त्यांच्या नातेवाईकांच्या निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ त्यांच्या गळ्या भोवतीचा दोरीचा फास सोडवून, करवीर पोलीस यांच्या मदतीने उपचारासाठी कोल्हापूरातील सीपीआर हॉस्पीटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला. त्यांच्या पाश्चात्य पत्नी, मुलगा,सून नातवंडे, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. या घडल्या घटनेची नोंद रात्री उशिरा करवीर पोलीस ठाण्यात झाली असून, आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.