महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गावातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करणारी कणकवलीतील कलमठ ग्रामपंचायत ठरली पहिली

04:41 PM Sep 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

शैक्षणिक विकासासाठी सर्वोतोपरी सहकार्य - संदिप मेस्त्री

Advertisement

कणकवली / प्रतिनिधी

Advertisement

१५ व्या वित्त आयोग मधून बाल स्नेही गाव संकल्पंतर्गत कलमठ गावातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित करण्यात आले आहेत. विद्यार्थी सुरक्षा दृष्टीने महत्त्वाचे पाऊल ग्रामपंचायत कलमठने उचलले आहे. शाळा व विद्यार्थी विकासासाठी आता पर्यंत ग्रामपंचायत नेहमी प्रयत्नशील राहिली असून यापुढे देखील गावातील शाळेचा शैक्षणिक दर्जा नेहमी वाढता राहण्यासाठी आपण नेहमी शाळांना सहकार्य करू असे यावेळी सरपंच संदिप मेस्त्री म्हणाले.कणकवली तालुक्यात गावातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही कार्यान्वित करणारी कलमठ ग्रामपंचायत ही पहिली ग्रामपंचायत असल्याचे यावेळी मुख्याध्यापक मधुरा सावंत म्हणाल्या. शाळेतील विद्यार्थिनीना सीसीटीव्ही उपक्रमाचे उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला.यावेळी उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, ग्रामविकास अधिकारी प्रवीण कुडतरकर, मुख्याध्यापक मधुरा सावंत, श्रीकांत बुचडे, ग्रामपंचायत सदस्य नितीन पवार, अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री, स्वाती नारकर, धीरज मेस्त्री, नजराणा शेख, इफत शेख, अमोल कोरगावकर, गुरू वर्देकर, प्रमोद पवार, अमीत हर्णे, नेहा वावळीये, विद्या लोकरे, रमेश डोईफोडे, चीत्राक्षी देसाई, इंदू डगरे, ऋतुजा जाधव आदी शिक्षक व शाळा व्यवस्थापन सदस्य उपस्थित होते .

Advertisement
Tags :
#tarun bharat sindhudurg# kankavli # kalmath
Next Article