For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कलामहर्षी के.बी.कुलकर्णी सर्वोच्च पुरस्कारापासून वंचित

12:47 PM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
कलामहर्षी के बी कुलकर्णी सर्वोच्च पुरस्कारापासून वंचित
Advertisement

ज्येष्ठ चित्रकार दत्ता पाडेकर यांनी व्यक्त केली खंत : के. बी. कुलकर्णी जयंतीनिमित्त कार्यक्रम

Advertisement

बेळगाव : कलामहर्षी के. बी. कुलकर्णी म्हणजे कला क्षेत्रातील एक दिग्गज नाव. त्यांनी आपली विद्वत्ता व प्रतिभेच्या जोरावर अनेक शिष्य घडविले. रवी परांजपे, जॉन फर्नांडिस, मारुती पाटील यासारख्या उत्तम चित्रकारांना त्यांनी चित्रकलेचे विश्व खुले करून दिले. अशा दिग्गज कलामहर्षीला ‘पद्मश्री’सारखा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव होणे गरजेचे होते. परंतु पुरस्काराची निवड करणाऱ्यांना कलेविषयी फारशी माहिती नसल्यामुळे अशा व्यक्ती पुरस्कारापासून दूर राहिल्याची खंत ज्येष्ठ चित्रकार दत्ता पाडेकर यांनी व्यक्त केली. कलामहर्षी के. बी. कुलकर्णी जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. टिळकवाडी येथील वरेरकर नाट्या संघाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. अनिल चौधरी होते. व्यासपीठावर गडहिंग्लज येथील ज्येष्ठ चित्रकार काशिनाथ हिरेमठ, बेळगावचे चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर, नितीन कपिलेश्वरकर, जगदीश कुंटे, प्रतिभा कुलकर्णी यांसह इतर उपस्थित होते.

स्पर्धेत 1) अभिजित भोसले (मिरज), 2) प्रतिक अक्कतंगीरहाळ (देवरुख), 3) अमर राऊळ (देवरुख), उत्तेजनार्थ-अमरदीप कुंभार (कोल्हापूर), सौंदर्या बनसोडे (शिनोळी), हर्षिला बांगर (मुंबई), आदित्य कोकीतकर (सांगली) यांनी क्रमांक मिळविला. चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन नितीन कपिलेश्वरकर यांच्या हस्ते झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. लावण्या जाधव व मीना कुलकर्णी यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. स्वागत व प्रास्ताविक जगदीश कुंटे यांनी केले. मानपत्राचे वाचन प्रिया कवठेकर व प्राजक्ता बेडेकर यांनी केले. यानंतर प्रा. किरण हणमशेट यांनी चित्रकला स्पर्धेविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षक संदीप ताशिलदार यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. अनिल चौधरी यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले तर स्मिता कुलकर्णी यांनी आभार मानले.

Advertisement

पुरस्काराने मान्यवरांना सन्मानीत 

गडहिंग्लज येथील चित्रकार काशिनाथ हिरेमठ यांना के. बी. कुलकर्णी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. बेळगावचे चित्रकार चंद्रशेखर रांगणेकर यांना के. बी. कुलकर्णी कलागौरव पुरस्कार देण्यात आला. कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या या दोघांना पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. ज्येष्ठ चित्रकार दत्ता पाडेकर यांच्या हस्ते हा सत्कार झाला.

Advertisement
Tags :

.