निस्वार्थीपणे कलेची सेवा करणाऱ्यांसाठी ‘कला गौरव योजना’ सुरू केली : कामत
मडगावात रंगभूमी दिन साजरा
मडगाव : आपण कला व संस्कृती मंत्री झालो तेव्हा प्रामाणिक कलाकारांवर अन्याय होऊ नये यासाठी ‘कला गौरव पुरस्कार’ योजना सुरू केली. गोव्यात असे असंख्य कलाकार होते. ज्यांनी कलेच्या क्षेत्रात उल्लेखनिय योगदार दिले होते. दिवस-रात्र कलेसाठी ते कार्यरत होते, निस्वार्थी भावनेने त्यांनी कलेची सेवा केली होती. कलेची सेवा करताना त्यांनी कोणतीच अपेक्षा ठेवली नव्हती. अगदी प्रामाणिकपणे कलेची सेवा करत होते. मात्र, त्यांची कुठेच दखल घेतली जात नव्हती. अशा कलाकारांना नजरेसमोर ठेऊन कला गौरव पुरस्कार योजना सुरू केल्याचे उद्गार मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी काढले. रवींद्र भवन मडगाव व सम्राट क्लब मडगाव सेंट्रल यांनी आयोजित केलेल्या रंगभूमा rदिन कार्यक्रमात दिगंबर कामत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून तर ज्येष्ठ नाट्याकर्मी तसेच ‘संभवामि युगे युगे’ महानाट्या फेम कलाकार डॉ. मोहनदास वासुदेव कामत, रवींद्र भवनचे उपाध्यक्ष मनोहर बोरकर व सम्राट क्लब मडगाव सेंट्रलच्या अध्यक्ष रचना देशपांडे उपस्थित होत्या. यावेळी ज्येष्ठ नाट्याकर्मी व गायक कलाकार दामोदर पुंडलिक काणेकर, देवबाला शशिकांत भिसे, प्रमिला सुभाष बोरकर तसेच ज्येष्ठ रंगकर्मी उमाकांत सावंत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना दिगंबर कामत म्हणाले की, मडगावात सर्वप्रथम सम्राट क्लबची स्थापना आपण केली होती. सम्राट क्लबची स्थापना व्हावी यासाठी शिंक्रे हे आग्रही होते. त्यांच्यामुळेच आपण पुढाकार घेतला व सम्राट क्लबची स्थापना केली. त्यावेळी आपण सर्व मित्रांना सम्राट क्लबची सदस्य बनविले. मात्र, त्यावेळी महिलांना सम्राट क्लबच्या सदस्या बनविण्यात आपल्याला बऱ्याच अडचणी आल्या. आता बघितल्यास सम्राट क्लब मडगाव सेंट्रलमध्ये सर्व महिलांच कार्यरत आहेत. त्यामुळे सम्राट क्लब मडगाव सेंट्रलला उज्वल भविष्य आहे.
आपण त्यांना महत्व देत नाही...
बालपणापासून आपल्याला किर्तन, नाटक, संगीत यांची आवड होती. त्यामुळे आपण आवर्जुन अशा कार्यक्रमाना जात असे. आपली देवावर श्रद्धा व भक्ती आहे. हे फक्त देवाला व आपल्याला ठाऊक आहे. आज काहीजण ‘आपण देवाचा माणूस’ आहे असे म्हणून थट्टा करतात. पण, आपण कशा गोष्टींना महत्व देत नाही. तिसऱ्या व्यक्तींने स्पष्टीकरण देण्याची काहीच गरज नाही. डॉ. मोहनदास वासुदेव कामत यांनी आपल्या मनोगतात सम्राट क्लब मडगाव सेंट्रलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सुरवातीला मनोहर बोरकर यांनी प्रास्ताविक तर सम्राट क्लब मडगावच्या अध्यक्ष रचना देशपांडे यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ खांडेपारकर यांनी केले. सत्कार सोहळ्यानंतर ‘नाट्यारंग’ हा सावेष साभिनय लोकप्रिय नाट्यासंगीताचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात गोव्यातील सुप्रसिध्द गायक कलाकार गायत्री पाटील, शारदा शेटकर, युगा सांबारी तसेच गौरांग भांडीये सहभागी झाले होते. त्याना शिवानंद दाभोलकर(ऑर्गन) व नितीन कोरगावकर (तबला) यांनी संगीत साथ केली.