कुस्ती स्पर्धेत काकतकर कॉलेजचे यश
10:51 AM Nov 15, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : विजयपूर, तालीकोटी येथील कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ अंतर्गत आंतरमहाविद्यालय कुस्ती स्पर्धेत भाऊराव काकतकरच्या मल्लांनी उपविजेतेपद पटकावले. सदर या स्पर्धेतील चार मल्लांची ‘अखिल भारतीय आंतररविद्यापीठ कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत स्वाती पाटीलने 57 किलो वजन गटात सुवर्ण, सुरज पाटीलने ग्रिको रोमन 42 किलो वजन गटात सुवर्ण, तुकारामने, ग्रिकोरोमन कुस्ती प्रकारात 79 किलो वजनगटात सुवर्ण, चेतन धामणेकरने फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात सुवर्ण तर निखील पाटीलने ग्रिकोरोमन 97 किलो वजन गटात रौप्य पदक पटकविले आहे.या मल्लांना क्रीडा प्राध्यापक प्रा. सुरज के. पाटील तसेच डी. वाय. एस्. एस्. हॉस्टेलचे कोच यांचे मार्गदर्शन व प्राचार्य डॉ. एम्. व्ही. शिंदे प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article