For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

क्वीन ऑफ क्वीन्स’मध्ये काजोलचा अॅक्शन अवतार

06:49 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
क्वीन ऑफ क्वीन्स’मध्ये काजोलचा अॅक्शन अवतार
Advertisement

अनेक भाषांमध्ये होणार प्रदर्शित

Advertisement

बाजीगर, कुछ कुछ होता है, गुप्त आणि फना यासारख्या चित्रपटांद्वारे अभिनेत्री काजोलने बॉलिवूडमधील स्वत:च्या 32 वर्षांच्या कारकीर्दीत अभिनयाच्या अनेक छटा दाखवून दिल्या आहेत, परंतु तिने कधीच अॅक्शनवर आधारित भूमिका साकारलेली नाही. परंतु आता काजोल अॅक्शन दृश्य करताना दिसून येणार आहे. तेलगू चित्रपट चरण तेज उप्पलपति  याचा पहिला अखिल भारतीय चित्रपट ‘क्वीन ऑफ क्वीन्स’मध्ये काजोल काम करणार आहे. या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

काजोलने या चित्रपटाकरता अॅक्शनसंबंधी तयारी केली आहे. चित्रपटात काजोल मुंबईच्या झोपडपट्टीत वाढलेली महिला माया ही भूमिका साकारत आहे. माया ही महाराष्ट्रातील सर्वात शक्तिशाली महिला होत असल्याचे या चित्रपटात दाखविले जाणार आहे.

Advertisement

या चित्रपटाची कहाणी अपत्याच्या स्वत:च्या आईवडिलांवरील प्रेमावर आधारित आहे.  या चित्रपटाचे चित्रिकरण हैदराबाद येथे पार पडले आहे. या चित्रपटात काजोलसोबत नसीरुद्दीन शाह, प्रभू देवा, जीसू सेनगुप्ता हे कलाकार दिसून येणार आहेत. हिंदीसोबत हा चित्रपट तेलगू, तमिळ, मल्याळी आणि कन्नडमध्ये देखील प्रदर्शित करण्याची योजना आहे. या चित्रपटाचे उर्वरित चित्रिकरण लवकरच मुंबईत पार पडणार आहे.

Advertisement
Tags :

.