‘मां’ चित्रपटात काजोल
अजय देवगणकडून निर्मिती
आगामी भयपट ‘मां’चे निर्माते अजय देवगणने चित्रपटात अधिक अॅक्शन दृश्य जोडण्याची तयारी केली आहे. या चित्रपटात त्याची पत्नी काजोल मुख्य भूमिकेत ओह. चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल फूरिया आता चालू महिन्यात यातील काही दृश्य नव्याने चित्रित करणार आहे.
या चित्रपटाची कहाणी साईविन क्वाड्रास यांनी लिहिली असून त्यांनीच काही बदल सुचविले होते. या बदलांची कल्पना पसंत पडल्याने अजयने नव्याने काही दृश्य साकारण्याची तयारी चालविली आहे. पश्चिम बंगालच्या चंदनपूर येथे स्थापित ‘मां’ एका आईची स्वत:च्या मुलीला अलौकिक शक्तींपासून वाचविण्याच्या लढाईची कहाणी आहे.
प्रेक्षकांना आईमुलीच्या कहाणीशी अधिक जोडण्यासाठी काही भावनात्मक क्षण जोडण्यात यावेत असे अजय देवगणचे मानणे होते. अजय देवगणच्या सूचनांवर सहमत होत दिग्दर्शक विशाल फुरियाने याकरता तयारी सुरू केली आहे. या चित्रपटाचे अॅक्शन दिग्दर्शक म्हणूनन आर.पी. यादव यांनी जबाबदारी सांभाळली आहे.