दिल्लीच्या नवनर्वाचित मुख्यमंत्रींच्या शपथविधीमध्ये कैलाश खेरचे खास गाणं
दिल्ली
दिल्लीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. दिल्लीमध्ये भाजपचा डंका जोरदार वाजला. भाजपाच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची वर्णी लागली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ताच्या यांच्या शपथविधी सोहळ्यात गायक कैलाश खैर यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात गायक कैलाश खेर त्यांच्या ये शंखनाद है या गाण्याचे लॉन्चिंग होणार आहे. हे गाण खास दिल्लीकरांसाठी बनवण्यात आलेले आहे. भाजपच्या रेखा गुप्ता यांचा शपथविधी आज (दि. २०) रोजी दिल्लीतील रामलिला मैदान होणार आहे.
ये शंखनाद है या गाण्याविषयी बोलताना गायक कैलाश खेर म्हणाले, हे गाणं खास दिल्लीकरांसाठी बनविण्यात आलेले आहे. दिल्लीकरांनी भाजपला प्रचंड मताधिक्याने एक हाती सत्ता दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे गाणं आज शपथविधी सोहळ्यात सादर केले जाणार आहे.
दिल्लीमध्ये भाजपने मिळवलेल्या विजयी सत्तेबद्दल अभिनंदन करत आणि खास दिल्लीकरांसाठी बनविण्यात आलेल्या गाण्याबद्दल गायक कैलाश खेर यांनी त्यांत्या इन्स्टाग्राम हॅण्डेलवरून पोस्ट सुद्धा केलेली आहे.