For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kagal-Nipani Road Accident : निपाणी-मुरगुड रस्त्यावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू

12:38 PM Jun 23, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
kagal nipani road accident   निपाणी मुरगुड रस्त्यावर भीषण अपघात  तिघांचा मृत्यू
Advertisement

मयत झालेल्यांमध्ये एकजण खडकेवाडा तर दोघेजण निपाणीतील

Advertisement

सेनापती कापशी : खडकेवाडा (ता. कागल) येथील निपाणी मुरगुड रस्त्यावर चारचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकूण तीनजण ठार झाले आहेत. एकाचा जागीच तर दोघांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली सविस्तर माहिती अशी, खडकेवाडा येथील बाळू ताशीलदार हे काल मोहरमचा कार्यक्रम असल्यामुळे कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा आपल्या गलगले फाटा येथील जनावरांच्या गोठ्याकडे आपल्या पत्नीसह चालत जात होते. दरम्यान, पाठीमागून चारचाकी गाडीने जोराची धडक दिल्याने तहसीलदार जागीच ठार झाले. तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या आहेत.

Advertisement

या अपघातानंतर प्रचंड वेगात असणाऱ्या गाडीच्या चालकाचा ताबा सुटल्याने गाडी सरळ रस्त्याच्या उंचावरून सुमारे २०० फूट खोल व दूर नदी काठावरील बाजूला झाडे झुडपात जाऊन पडली आहे. गाडीमधील एकजण रात्री व काही वेळापूर्वी दुसराही मयत झाल्याचे समजते. हे दोन्ही मयत निपाणी येथील आहेत. त्यांची अद्याप नावे समजलेली नाहीत.

Advertisement
Tags :

.