For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur ZP Madarsangh 2025: कागलमध्ये 6 गट आणि हातकणंगलेतील दोन गटांची नव्याने रचना

01:52 PM Jul 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
kolhapur zp madarsangh 2025  कागलमध्ये 6 गट आणि हातकणंगलेतील दोन गटांची नव्याने रचना
Advertisement

कागल तालुक्यामध्ये एका नव्या जिल्हा परिषद मतदारसंघाची निर्मिती झाली

Advertisement

सेनापती कापशी : कागल तालुक्यामध्ये एका नव्या जिल्हा परिषद मतदारसंघाची निर्मिती झाली आहे. यामुळे आता तालुक्यात ६ गट आणि १२ गण तयार झाले आहेत. तालुक्यातील गट, गण येथील वाढलेल्या मतदारसंख्येवर तयार झाले
असे असणार तालुक्यातील गट
कसबा सांगाव : कसबा सांगाव, सुळकूड,
रणदिवेवाडी, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, पिंपळगाव खुर्द, करनूर, वंदूर, शंकरवाडी.
सिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली, व्हन्नूर, एकोंडी,
बामणी, शेंदूर, महाकवे, गोरंबे, केनवडे, सावर्डे खुर्द, साके.
बोरवडे : सावर्डे बुद्रुक, केंबळी, बेलवळे खुर्द, बेलवळे बुद्रुक, बाचणी, वाळवे खुर्द,
आहेत.

कागल तालुक्यामध्ये बानगे जिल्हा परिषद मतदारसंघ हा नव्याने पिराचीवाडी, बोरवडे, बिद्री, सोनाळी, निढोरी, उंदरवाडी, फराकटेवाडी. नानीबाई चिखली : नानीबाई चिखली, कौलगे, बस्तवडे, खडकेवाडा, हमिदवाडा, गलगले, अर्जुनी, लिंगनूर कापशी, अर्जुनवाडा, दौलतवाडी, मेतके, करड्याळ, जैन्याळ

Advertisement

सेनापती कापशी : सेनापती कापशी, बाळीने, मुगळी, नंद्याळ, बाळेघोल, तयार झालेला गट आहे. तालुक्यात मतदारसंघाची रचना बदलली असल्यामुळे काही गावे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागली आहेत. त्यामुळे इच्छुकांना नव्याने सर्व जोडण्या लावाव्या लागणार आहेत.

हणबरवाडी, तमनाकवाडा, हळदवडे, बेलेवाडी मासा, करंजीवने, माद्याळ, वडगाव, अलाबाद, कासारी, बेलेवाडी काळम्मा, हसुर खुर्द, बोळावीवाडी, बोळावी, ठाणेवाडी, हसूर बुद्रक, मांगनूर. बानगे (नवा गट): बानगे, आनूर, पिंपळगाव बुद्रुक, मळगे खुर्द, मळगे बुदु-क, भडगाव, चौंडाळ, चिमगाव, शिंदेवाडी, कुरणी, सुरुपली, कुरुकली, सोनगे, यमगे

हातकणंगले : तालुक्यातील इच्छुकांचे लक्ष लागून राहिलेल्या अकरा जिल्हा परिषद आणि बावीस पंचायत समिती मतदार संघाची रचना अखेर आज जाहीर झाली. नव्याने निर्माण झालेल्या मतदारसंघ रचनेमुळे 'कही खुशी कही गम' अशी अवस्था झाली आहे.

हातकणंगले आणि हुपरी गावांची नगरपंचायत झाल्याने जुन्या हातकणंगले जिल्हा परिषद मतदारसंघाचे आळते आणि हुपरी जिल्हा परिषद मतदारसंघाचे नव्याने रुई जिल्हा परिषद मतदारसंघ निर्माण झाला आहे. भादोले, आळते, कोरोची, कबनूर आणि रेंदाळ मतदारसंघात किरकोळ बदल झाले आहेत. तर शिरोली, रुकडी, रुई आणि पट्टणकोडोली मतदारसंघांमध्ये फार मोठे बदल झाल्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी फिरले आहे.

घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघात कोणताही बदल झालेला नाही. भादोले जिल्हा परिषद मतदारसंघ यामध्ये टोप गावातील प्रभाग क्रमांक सहाचा शिरोली जि. प. मतदारसंघात समावेश केला आहे. शिरोली जिल्हा परिषद मतदारसंघ तासगाव, मौजे वडगाव ही गावे कमी झाली आहेत. त्यांचा समावेश रुकडी जि. प. मतदारसंघात झाला आहे.

रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघ अतिग्रे, मुडशिंगी ही गावे कमी होऊन त्यांचा समावेश नव्याने झालेल्या रुई जि. प. मतदारसंघात केला आहे. रुई जिल्हा परिषद मतदारसंघ साजणी, तिळवणी ही गावे नव्याने घेतली असून कोरोची जि. प. मतदारसंघ प्रभाग क्रमांक एक, दोन कमी करून त्यांचा समावेश कबनूर मतदारसंघात केला आहे.

कबनूर जिल्हा परिषद मतदारसंघ पूर्वीप्रमाणेच कायम ठेवला आहे. पट्ट‌णकोडोली जिल्हा परिषद मतदारसंघ : माणगाव, माणगाववाडी ही गावे कमी केली आहेत. चंदूर, इंगळी, तळंदगे गावांचा नव्याने समावेश केला आहे. रेंदाळ जिल्हा परिषद मतदारसंघ : चंदूर गावचा नव्याने समावेश झाला आहे.

हातकणंगलेऐवजी नव्याने निर्माण झालेल्या आळते जिल्हा परिषद मतदारसंघात नेज गावचा समावेश केला आहे. कुंभोज जि. प. मतदारसंघातून नेज गाव वगळले आहे. घुणकी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये कोणताही बदल झालेला नाही.

Advertisement
Tags :

.