For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारखान्याच्या छतावरून पडलेल्या जखमी तरुणाचा मृत्यु

01:10 PM Sep 05, 2024 IST | Abhijeet Khandekar
कारखान्याच्या छतावरून पडलेल्या जखमी तरुणाचा मृत्यु
Kagal MIDC Injured youth dies
Advertisement

कोल्हापूर / प्रतिनिधी

हातकणंगले - कागल पंचताराकिंत औद्योगिक वसाहतमधील एका कारखान्याच्या छतावरून पडून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यु झाला. राहूल निवास कोळी ( वय २८, पट्टणकोडोली, ता. हातकणंगले ) असे त्यांचे नाव आहे. या बाबतचा गुन्हा शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाला आहे.

Advertisement

राहूल कोळी हा फॅब्रिकेशनचे काम करतो आहे. तो हातकणंगले - कागल पंचताराकिंत औद्योगिक वसाहतमधील एका खासगी कारखान्यात काम करीत होता. तो १ सप्टेंबर रोजी कारखान्याच्या सुमारे ४० फुला वरील छतावर फॅब्रिकेशनचे काम करीत होता. यावेळी अचानक छतावरुन खाली पडल्याने, त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी तात्काळ कोल्हापूरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण त्यांची प्रकृती सुधारण्याऐवजी बिघडत गेली. गुरुवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला.

Advertisement
Advertisement
Tags :

.