कडोलीचा खो-खो, थ्रोबॉल संघ पात्र
बेळगाव : कडोली येथे सार्वजनिक शिक्षण खाते व जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय खो-खो व थ्रोबॉल स्पर्धेत कडोलीतील श्री शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूंनी विजेतेपद पटकावित जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. कडोली येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत मुलांच्या खो-खो संघाने विजेतेपद पटकाविले तर मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. मुलींच्या थ्रोबॉल संघाने विजेतेपद पटकाविले. विजेत्या खो-खो संघात सिद्धार्थ रुटकुटे, श्रेयेश उच्चुकर, किसन चौगुले, प्रेम पाटील, युवराज पाटील, मानमोडे, पार्थ उच्चुकर, ओमकार पाटील, श्री बोकडे, स्वप्नील पाटील, ज्ञानेश्वर कुट्रे, गणेश खन्नुकर आदी खेळाडूंचा समावेश आहे. तर मुलींच्या थ्रोबॉल संघात समिक्षा मानमोडे, सानिका बोकडे, छोटी पावले, करुणा रुटकुटे, छाया पाटील, अनुराधा पावले, राधिका लाड, श्वेता पाटील, आश्विनी पाटील, प्रिती मस्कार, समर्था काकतकर, दिशा पाटील आदी खेळाडूंचा समावेश आहे. वरील विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक एन. आर. पाटील यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका व्ही. वाय. पाटील व शिक्षकवर्गाचे प्रोत्साहन लाभत आहे.