For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gadhinglaj | कडगावच्या जवानाचा दिल्ली येथे अपघातात मृत्यू

02:02 PM Apr 03, 2026 IST | NEETA POTDAR
gadhinglaj   कडगावच्या जवानाचा दिल्ली येथे अपघातात मृत्यू
Advertisement

                   कडगावचा जवान अक्षय चौगुले यांचा दिल्लीत अपघाती मृत्यू

Advertisement

गडहिंग्लज - कडगाव (ता. गडहिंग्लज) येथील जवान अक्षय विलास चौगुले (वय ३३) यांचा दिल्ली येथील मेरठ युनिटमध्ये कार्यरत असताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री घरातून युनिटमध्ये जात असताना चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. दिल्ली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. त्यांचा मृत्यू जवान अक्षय चौगुले हे भारतीय लष्करातील मराठा बटालियनमध्ये २०१५ पासून कार्यरत होते. २०२० मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यानंतर ते पत्नी स्नेहा यांच्यासोबत दिल्ली येथे राहत होते.

नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री मेरठ येथील युनिटमध्ये कर्तव्य बजावण्यास जात असताना त्यांच्या दुचाकीलासमोरासमोर चारचाकीची धडक दिल्याने जवान अक्षय यांना गंभीर दुखापात झाली. त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. त्यांच्याबार उपचार सुरू असताना गुरूवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मावळल्याची सांगण्यात आले. ही बातमी कडगाव येथील नातेवाईकांना समजताच त्यांनी तातडीने दिल्ली गाठली आहे. जवान अक्षय यांच्या पश्चात आई-पत्नी, भाऊ असा परिवार वडिल, आहे.

Advertisement

दरम्यान ग्रामस्थ आणि महसूल विभागाकडून गावात अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली आहे. जवान अक्षय यांचे पार्थिव दिल्लीहून पुणे किंवा कोल्हापूर येथून मुळगाव कडगाव येथे शुक्रवारी सायंकाळपर्यंत येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांनतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :

.