टेंभू योजनेच्या पाण्याने कडेपूरची इचं अन् इंच जमीन बागायत होणार : पृथ्वीराज देशमुख
श्रीवडलाईदेवी पाणी उपसा योजनेचा भूमिपूजन संपन्न; १२८६ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार
कडेगाव: प्रतिनिधी.
टेंभू योजनेचे जनक स्व. संपतराव आण्णा देशमुख यांनी टेंभू उपसा जलसिंचन योजनेची मंजुरी घेतली या योजनेचे पाणी सांगोल्यापर्यंत पोहोचले आहे. ज्या गावाने अण्णांना लहानाचे मोठे केले त्या गावची काही जमीनच या पाण्यापासून वंचित होती. ही बाब नेहमी आम्हाला मनाला लागत होती. त्यामूळेच शर्तीचे प्रयत्न करून ही श्री वडलाईदेवी पाणी उपसा सिंचन योजना प्रथम दोन्ही कारखान्या मार्फत सुरू केली. काही तांत्रिक अडचणी मुळे हि योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने शासनाकडे सुपूर्द करून या योजनेसाठी २२ कोटीची मंजुरी मिळाली. असे प्रतिपादन माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केले.
कडेपूर ता.कडेगावया ठिकाणी श्री वडिलाई देवी पाणी उपसा योजनेच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते.स्वागत व प्रास्ताविक कडेपूर येथील लोकनियुक्त सरपंच सतिष भाऊ यांनी केले.यावेळी टेंभू योजनेचे जनक लोकनेते स्व.संपतराव देशमुख आण्णा यांच्या प्रतिमेचे पुजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
पुढे बोलताना पृथ्वीराज देशमुख बाबा म्हणाले की कडेपूर गावाने आम्हा देशमुख कुटुंबीयांना भरभरून प्रेम दिले म्हणूनच आम्ही आज इथ पर्यंत मजल मारू शकलो. त्यामूळे या गावाची इंच ना इंच जमीन बागायत होणार आहे.
यावेळी युवा नेते सत्यजित देशमुख ऊफै बंडू भैय्या, राष्ट्रवादी युवा नेते जयदीप यादव यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती विटाचे माजी सभापती विलासराव यादव, कडेपूर चे सरपंच सतीश देशमुख, कडेगाव तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष जयदीप यादव, सत्यजित यादव उर्फ बंडूभैय्या, भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष राजाराम गरुड, भाजपा ओबीसीसेल जिल्हाध्यक्ष प्रकाश गडळे भाजपा कडेगांव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे, सिध्दीविनायक पतसंस्था चेअरमन युवराज यादव,माजी सरपंच प्रतापदादा यादव, धनाजीराव यादव, विलासराव गरूड, अजितदादा यादव,धन्यकुमार यादव, नामदेव यादव,प्रमुख उपस्थित होते.आभार उपसरपंच अनिल यादव यांनी मानले.