महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ब्रेक निकामी झाल्याने चिंबल येथे कदंब कलंडली

12:23 PM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चालकासह दहा प्रवासी जखमी : काही वेळ वाहतुकीची कोंडी

Advertisement

पणजी : कदंब महामंडळाची बस फोंड्याहून पणजीला येत असताना काल शुक्रवारी सकाळी पणजी-जुने गोवे महामार्गावरील चिंबल जंक्शननजीक उतरणीवर कलंडली. त्यामुळे दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तातडीने गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले. याबाबतची माहिती पोलिसांना मिळताच पोलिस आणि अग्निशामक तसेच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाले. बसचा ब्रेक अचानक निकामी झाल्याने हा अपघात झाला, अशी माहिती किरकोळ जखमी झालेल्या बसचालकाने दिली. उतारावरून खाली येत असताना ब्रेक निकामी झाल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्यावेळी वाहनांची वर्दळ सुऊ होती. तरीही बसचालकाने प्रसंगावधान राखत रस्त्याच्याकडेला असलेल्या दुभाजकाचा आधार घेत गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र बस थांबली नाही. तापेर्यंत बसचा वेग कमी झाला होता. इतर वाहनांना धडकू नये म्हणून बसचालकाने डावीकडे बस वळविली. बस मार्गावरून बाहेर गेली आणि हळूहळू बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडली. दरम्यान वर्दळीची वेळ असल्याने किंचित वाहतुकीची कोंडी झाली.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article