कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव येथील कचेरी रोड बनला आता वाहनांसाठी ‘वन वे’

12:32 PM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोलीस आयुक्तांचा आदेश

Advertisement

बेळगाव : शहरातील वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय ते शनिवार खूटपर्यंतचा कचेरी रोडवर एकेरी वाहतूक (वनवे) सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा अधिकृत आदेश मंगळवार दि. 4 रोजी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी बजावला असून उत्तर दिशेकडून दक्षिणकडे येणाऱ्या वाहनांसाठी भडकल गल्ली क्रॉसपर्यंत निर्बंध असणार आहेत.

Advertisement

वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त जोतिबा निकम यांनी पदभार स्वीकारल्यापासून वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. विशेषकरून बाजारपेठेतील अतिक्रमण हटविण्यासाठी त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. राणी चन्नम्मा चौकात विविध संघटना आंदोलन करीत असल्याने वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. त्यामुळे चन्नम्मा चौक ‘नो प्रोटेस्ट झोन’ म्हणून जाहीर करण्यात यावा, आंदोलनकर्त्यांसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा प्रस्ताव एसीपी जोतिबा निकम यांनी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्याकडे दिला आहे.

शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली असल्याने व्यापारी आस्थापनातील बेसमेंटची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू झाले आहे. संबंधित आस्थापनातील व्यापारी व ग्राहकांनी आपली वाहने रस्त्यावर पार्क करण्याऐवजी ती बेसमेंटमध्ये पार्क करणे गरजेचे आहे. पण बहुतांश ठिकाणी पार्किंगसाठी असलेल्या बेसमेंटमध्ये व्यवसाय थाटले आहेत. भविष्यात संबंधित बेसमेंट चालकांवर कारवाई करून पार्किंगसाठी उपलब्ध करण्यासाठी पाऊले उचलली जाणार आहेत.

कचेरी रोडवर दररोज वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय, न्यायालय, उपनोंदणी कार्यालय, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, तहसीलदार, नाडा कचेरी, रेकॉर्ड ऑफिस, ग्रामीण उपविभाग एसीपी कार्यालयासह इतर महत्त्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. ही बाब लक्षात घेत कचेरी रोडवरून उत्तरेपासून दक्षिणेकडे येणाऱ्या वाहनांना यापुढे निर्बंध असणार आहे. शनिवार खूटपासून कचेरी रोड मार्गे चारचाकी आणि तीनचाकी वाहने भडकल गल्ली क्रॉसपर्यंत येऊ शकतात. त्यानंतर भडकल गल्लीमार्गे सदर वाहनांना पुढे जावे लागणार आहे. याबाबतचा आदेश मंगळवार दि. 4 रोजी भूषण बोरसे यांनी जारी केला असून लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article