कबाली चित्रपटाच्या निर्मात्याची आत्महत्या
गोवा
सिनेसृष्टीत अनेक कलाकार तंत्रज्ञांना कामातील चढउतारांना सामोरे हे जावेच लागते. काही जण त्यातून सुखरुप तरून पुढे जातात, तर काहीजण नैराश्याच्या गर्तेत अडकतात. नैराश्यात जाऊन पुढे आत्महत्येसारखे पाऊलही उचलले जाते, अशा अनेक घटना घडलेल्या समोर येतता. अशातच साऊथ सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली सिनेमाचे निर्माते के. पी. चौधरी यांनी गोवा येथे आत्महत्या केल्याची, घटना समोर आली आहे. आर्थिकदृष्ट्या काही ताणतणाव असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निर्माते सुंकार कृष्ण प्रसाद चौधरी हे अनेक दिवसांपासून नैराश्याच्या छायेत होते. त्यांना दरम्यान ड्रग्ज केस संदर्भात अटकही झाली होती. २०२३ मध्ये हैदराबाद पोलिसांनी त्यांना ड्रग्ज केस संदर्भात अटक केले. त्यांच्या आर्थिक संकटही होते. तरी या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
सुपरस्टार रजनीकांत यांच्या कबाली चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर ६०० कोटी रुपयांची कमाई केली होती. यानंतर निर्माते चौधरी यांना ड्रग्ज केस संदर्भात अटक झाली. या घटनेनंतर त्यांना इंडस्ट्रीमध्ये काम मिळेनासे झाली. त्यांनी गोव्यात ओएचएम नावाचा पबही सुरु केला होता.