For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कबड्डी : भारतीय महिलांचा इराणवर, पुरुषांचा बांगलादेशवर विजय

06:13 AM Sep 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
कबड्डी   भारतीय महिलांचा इराणवर  पुरुषांचा बांगलादेशवर विजय
Advertisement

वृत्तसंस्था, नागोया : आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीमध्ये भारताचे वर्चस्व कायम राहिले असून बुधवारी झालेल्या साखळी सामन्यांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी अनुक्रमे बांगलादेश आणि इराणवर दणदणीत विजय मिळवले. महिला संघाने आपल्या दुसऱ्या साखळी सामन्यात 2018 मधील सुवर्णपदक विजेत्या इराणचा 37-23 अशा फरकाने सहज पराभव केला, तर पुऊष संघाने ‘गट अ’मधील तिसऱ्या सामन्यात बांगलादेशवर 48-25 असा विजय मिळवला.

Advertisement

भारताचा पराभव कोण करू शकेल यावर दाडवे म्हणाले की, जगात कोणीही नाही. भारत पहिल्या क्रमांकावर आहे. हा आमचा खेळ आहे. याची सुरु वात भारतात झाली आणि आम्ही याचा खूप सराव करतो. आमच्याकडे अनेक चांगले खेळाडू आणि प्रशिक्षक आहेत. महिला संघ मध्यांतराच्या वेळी 19-15 असा आघाडीवर होता आणि उत्तरार्धातही त्यांनी आपले वर्चस्व कायम राखत प्रतिस्पर्ध्यावर पूर्णपणे मात केली. इराणविरुद्ध विजय मिळवल्याचा आम्हाला आनंद आहे. इराण हा एक चांगला संघ आहे हे आम्हाला माहित आहे. सुवर्णपदक जिंकणे हे आमचे ध्येय आहे, असे भारतीय खेळाडू पुष्पा राणा म्हणाली.

पुऊष संघानेही तितकेच आक्रमक प्रदर्शन केले. त्यांनी पहिल्या सत्रात 29-9 अशी आघाडी घेतली. जरी बांगलादेशने दुसऱ्या सत्रात चांगली कामगिरी केली, तरीही ते सामन्यात कधीच विजयाच्या स्थितीत येऊ शकले नाहीत. यापूर्वी भारतीय महिलांनी बांगलादेशचा 42-21 असा पराभव करून आपल्या मोहिमेची सुरु वात केली होती, तर पुऊष संघाने जपानचा 49-24 आणि दक्षिण कोरियाचा 63-31 असा पराभव केला होता. महिला संघ आज गुरु वारी जपानविऊद्ध आपला शेवटचा साखळी सामना खेळेल, तर पुऊष संघ चिनी तैपेईविऊद्ध अंतिम साखळी सामना खेळेल. हांगझोऊ येथे झालेल्या मागील स्पर्धेत पुरु ष आणि महिला अशा दोन्ही संघांनी सुवर्णपदके जिंकली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.