For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कास तलाव ओव्हर फ्लो ! सातारा शहरवासींयांची पाण्याची चिंता मिटली

02:44 PM Jul 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
कास तलाव ओव्हर फ्लो   सातारा शहरवासींयांची पाण्याची चिंता मिटली
Advertisement

सांडव्यावर भुशी डॅमचा फील; वजराई धबधब्याने केले रौद्र रूप धारण; उरमोडीच्या पाणी पातळीत वाढ

कास वार्ताहर

गेल्या पंधरा दिवसांपासुन कास परिसरात पावसाची दमदार बँटींग सुरू असुन ओढे नाले दुथडी भरून वाहत असल्याने सर्वच धरणांच्या पाणी पातळीत झपाटयाने वाढ होताना दिसत आहे शनिवारी रात्री सातारा शहराला पाणीपुरवठा करणारा कास तलाव ओव्हर प्लो होऊन ओसंडून वाहु लागल्याने सातारकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे धरणाच्या संडाव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे भुशी डॅमचा फिल येत असल्याने पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे तर याच पाण्याच्या प्रवाहामुळे भांबवली वजराई धबधब्याने रौद्ररूप धारण केल्याने पर्यटकांच्या नजरेचे पारणे फिटत आहे हे पाणी ऊरमोडी धरणात पोहचल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

Advertisement

सातारा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या भिंतीची उंची वाढविण्याचे काम गेल्या वर्षी पुर्ण झाले अनं पुर्ण क्षमतेने धरण भरू लागले 0 .५ अर्धा टिमसी ईतका पाणी साठा या धरणात होत असून २२ मिटर ईतकी पाणी पातळीची उंची आहे यावर्षी उन्हाळ्यात धरणात मुबलक पाणी साठा शिल्लक होता त्यामुळे पहिल्याच पावसात धरण ओसंडून वाहु लागले असून सातारकरांना मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे त्यातच शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अजुन एका नवीन पाईप लाईन चे काम जोरात सुरु असुन ते ही येत्या काही महिन्यात पुर्णत्वाकडे जाताना दिसत त्यामुळे आता दोन पाईप लाईन द्वारे सातारा शहराकडे पाणी येणार असल्याने शहरवासियांना पाण्याची कोणतीही चिंता भासणार नसल्याचे दिसत आहे
धरणाच्या संडव्यावरून वाहण्याऱ्या पाण्याला धाव घेण्यासाठी पायऱ्यांची निर्मिती केल्याने या पायऱ्यावरून ओसंडून टप्पे घेत वाहणाऱ्या पाण्यामुळे भुशी डॅमचा फिल निर्माण झाला आहे या पाण्याच्या प्रवाहात पर्यटकांना ऊतरण्यास बंदी असली तरी वाहणारे पाणी पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत
कास तलाव ओव्हर प्लो झाल्याने वाहणाऱ्या पाण्यामुळे भांबवली वजराई धबधब्याने आपले रौद्ररूप धारण केले आहे सर्वात उंचावरून तिन टप्यात धबधबा ओसंडुन वाहु लागल्याने पाणी फेसाळून उंच तुषारे उडु लागले असुन पर्यटकांच्या नजरेचे पारणे फिटत आहे पुढील दोन ते तिन महीने असाच नजारा वजराई धबधब्यावर पर्यटकांना अनुभवता येणार आहे
हेच पाणी उरमोडी धरणात जावुन विसावत असल्याने उरमोडी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे
१ कास तलाव ओव्हर फ्लो सांडव्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे भुशी डॅमचा फिल
२ कास तलावातून वाहनारे पाणी भांबवली वाजराई धबधब्यातुन जात असुन पाण्याचा प्रवाह वाढल्याने धबधब्याचा आविष्कार नयन रम्य देखावा पहायला मिळत आहे

Advertisement
Advertisement
Tags :

.