For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : कास तलावातील मृतदेह शोधण्यात यश 

12:56 PM Jun 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news   कास तलावातील मृतदेह शोधण्यात यश 
Advertisement

                                छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या सदस्यांचे अथक प्रयत्न

Advertisement

कास: कास तलाव परिसरात रविवारी सायंकाळी सातारा अमरलक्ष्मी वनवासवाडी येथील संग्राम हरिभाऊ भंडारे हे दोन मित्रांसमवेत फिरायला गेले होते. कास तलावामध्ये पोहताना संग्राम भंडारे (वय ४५) हे पाण्यात बुडाले. घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोध व बचाव मोहिमेला सोमवारी सकाळी अखेर यश आले असून, छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या अथक प्रयत्नांतून तलावातील सुमारे ७० ते ८० फूट खोल पाण्यात अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच संग्राम भंडारे रेस्क्यू टीम तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. तलावाची मोठी खोली, पाण्याचा कमी असलेला दृश्यमानतेचा स्तर आणि परिस्थिती यामुळे शोधकार्य अत्यंत आव्हानात्मक ठरत होते. मात्र टीमने संयम, धाडस आणि कौशल्याच्या जोरावर सलग प्रयत्न सुरू ठेवले.
या मोहिमेत चंद्रसेन पवार, ऋषिकेश रंकाळे, अथर्व बिडकर आणि अभिषेक शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या समन्वयपूर्ण कार्यामुळे आणि धाडसी प्रयत्नांमुळे खोल पाण्यातील मृतदेह शोधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी अनेक तास जीवाची पर्वा न करता शोधमोहीम राबवली. खोल पाण्यात उतरून तांत्रिक उपकरणांच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला.
या यशस्वी मोहिमेमुळे छत्रपती शिवेंद्रराजे भोसले रेस्क्यू टीमच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. आपत्ती आणि संकटाच्या काळात नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या या टीमने पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.
Advertisement
Advertisement
Tags :

.