For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News : कास तलावातील बोटींग रामभरोसे जॅकेटविना पर्यटकांची जीवघेणी बोटींग

12:55 PM Jun 01, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
satara news    कास तलावातील बोटींग रामभरोसे जॅकेटविना पर्यटकांची जीवघेणी बोटींग
Advertisement

                                                                        बोट चालकाचे सुरक्षेकडे दुर्लक्ष

Advertisement

कास : कास तलावात नौकाविहारचा आनंद लुटण्यासाठी कास बोंटीगबर पर्यकांची वर्दळ वाढू लागली असून अनेक पर्यटक पाण्यांच्या लाटांबार स्वार होत बिना जॅकेट जीवघेण्या स्थितीत बोटिंग करताना पहायला मिळत असल्याने पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. एखादा अपघात घडल्यावरच संबधित ठेकेदाराला जाग येणार का असा सवाल उपस्थित होत आहे. 

कास परिसर म्हटले की, पर्यटनाची पर्वणीच त्यात उन्हाळ्याच्या सुट्टी काळात कास तलावात बोटींगसाठी पर्यटकांची बर्दळ वाढू लागली असून परिसरात येणारे पर्यटक बोंटीगला अधिक पसंती देत नौकाविहाराचा आनंद लुटत असले तरी पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरुवातीला नियमांच्या चौकटीतच बोंटीग व्यवसाय करणार असल्याच्या बतावण्या करणारा ठेकेदार तिकीट फाडण्यातच व्यस्त दिसून येत आहे.

Advertisement

एक महिन्यापुर्वी कोयना जलायशयामध्ये तपोळा परिसरात पर्यटकांची बोट पलटी तिन जण बुडाले. त्यातील सेप्टी जॅकेट परिधान केल्यामुळे दोन पर्यटक बचावले. मात्र बिना जॅकेट असणाऱ्या स्थानिक बोट चालकाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. असे असतानाही कास तलावामधील बोटींगमध्ये पर्यटकांची सुरक्षा रामभरोसे झाली आहे. विना जैकेट पर्यटक बोंटीग करताना फोटोसाठी स्टंटबाजी करणे, वाऱ्याच्या वेगात लाटा उसळत असताना बिना चालक बोटींग करणे आदी प्रकार सर्रास सुरु आहेत.

ठेकेदार अपघाताची बाट पाहतोय की काय असा सवाल होत आहे. वाऱ्याच्या वेगामुळे पायंडल बोटी लटपटण्याची शक्यता पावसाळ्या पुर्वी वाहणारे वारे कास परिसरात अधुन मधुन जोराने वाहत असून कास तलावातील पाण्याच्या लाटा उसळत आहेत. त्यात पर्यटकांच्या चालकाविना जाणाऱ्या दोन हलक्या पायंडल बोटी लटपटण्याची शक्यता नकारता येत नाही. त्यामुळे अपघाताची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.