सरकारकडून कंत्राटामुळे के 2 इन्फ्राजेन तेजीत
06:34 AM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, मुंबई
Advertisement
पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या के 2 इन्फ्राजेनचा समभाग सोमवारी तेजीत दिसला. 1.23 टक्के तेजीसमवेत 70 रुपयांवर समभाग इंट्राडे दरम्यान पोहोचला होता. सरकारकडून कंपनीला 390 कोटी रुपयांचे रस्ता विकासाचे कंत्राट नुकतेच प्राप्त झाले आहे. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 90 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. सदरचे कंत्राट तेलंगणामधील रस्त्यांच्या कामाकरिता प्राप्त झालेले आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांचे काम कंपनी कंत्राटांतर्गत पुढील काळामध्ये करणार आहे.
Advertisement
Advertisement