For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वायनाडमध्ये राहुल गांधींसमोर के. सुरेंद्रन यांचे आव्हान

07:00 AM Apr 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
वायनाडमध्ये राहुल गांधींसमोर के  सुरेंद्रन यांचे आव्हान
Advertisement

वृत्तसंस्था /वायनाड

Advertisement

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपने प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांना उमेदवारी दिली आहे. सुरेंद्रन यांनी गुरुवारी वायनाड मतदारसंघासाठी स्वत:चा अर्ज भरला आहे. यादरम्यान त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी होत्या. केरळमधील वायनाड हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. परिसीमनानंतर 2009 मध्ये हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. तेव्हापासून सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेस येथे विजयी झाला आहे. वायनाड हा मुस्लीमबहुल मतदारसंघ आहे. काँग्रेसच्या बुधवारच्या रोड शोदरम्यान मुस्लीम लीगचे झेंडे लपविण्यात आले. एक तर राहुल गांधी यांना मुस्लीम लीगच्या पाठिंब्याची लाज वाटत असावी किंवा उत्तर भारतीय लोकांपासून स्वत:चे मुस्लीम लीगसोबतचे संबंध ते  लपवू पाहत असावेत, अशी टीका इराणी यांनी केली आहे.

पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनांवर बंदी असूनही राहुल गांधी त्याची राजकीय शाखा एसडीपीआयकडून समर्थन घेत असल्याचे पाहून धक्काच बसला.  उमेदवाराला अर्ज दाखल करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेप्रति निष्ठेची शपथ घ्यावी लागते. परंतु राहुल गांधी यांनी एसडीपीआयचे समर्थन मिळवत भारतीय राज्यघटनेप्रति स्वत:ची शपथच चुकीची ठरविली आहे असा दावा इराणी यांनी केला आहे. इंडिया आघाडीचा नेता कोण असे काँग्रेस आणि डाव्या पक्षांना विचारा. इंडिया आघाडीत राहुल गांधी यांचे नेतृत्व मान्य नसेल तर वायनाडमध्ये त्यांना कसे स्वीकारले जाईल? राहुल गांधी जेव्हा दक्षिण भारतात राजकारण करतात, तेव्हा सनातन धर्माच्या विरोधात बोलतात, मग निवडणुकीच्या काळात उत्तर भारतातील मंदिरांना भेट देतात. राहुल गांधी हे उत्तर भारतात येऊन आपण भगवान रामाचे भक्त आहोत असे सांगतील. राहुल गांधी यांनी भगवा ध्वज हातात घेत जय श्रीराम म्हणून दाखवावे असे आव्हान देत असल्याचे इराणी यांनी म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.