के.श्रीकांत, सुब्रमण्यम उपांत्यपूर्व फेरीत
06:00 AM Jan 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/बँकॉक
Advertisement
माजी जागतिक अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांत व एस. सुब्रमण्यम यांनी येथे सुरू असलेल्या थायलंड मास्टर्स बीडब्ल्यूएफ सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. श्रीकांतने 42 मिनिटांत हाँगकाँगच्या 20 वर्षीय जेसन गुणावान याचा 21-19, 21-15 असा पराभव केला. गेल्या आशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये श्रीकांतने गुणावानला हरविले होते. सुब्रमण्यमला मात्र विजयासाठी संघर्ष करावा लागला. इंडोनेशियाच्या चिको ऑरा ड्वि वार्डोयोवर त्याने 9-21, 21-10, 21-17 अशी मात केली. मिश्र दुहेरीत भारताच्या रोहन कपूर व रुत्विका ग•s यांना थायलंडच्या रात्चापोल मक्काससिथॉर्न व नत्तामोन लयसुआन यांच्याकडून 19-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला.
Advertisement
Advertisement