के.श्रीकांत, आयुष, तसनिम दुसऱ्या फेरीत
वृत्तसंस्था/ मकाव
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बीने आयुष शेट्टी, तसनिम मिर यांच्यासह येथे सुरू झालेल्या मकाव ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.
गेल्या मेमध्ये झालेल्या दुखापतीतून सावरल्यानंतर पुनरागमन करणाऱ्या के.श्रीकांतने पहिल्याच सामन्यात इस्रायलच्या डॅनील डुबोव्हेन्कोचा 21-14, 21-15 असा पराभव करून विजयी सुरुवात केली. त्याला येथे सहावे मानांकन मिळाले आहे. 2023 वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिपमध्ये कांस्य मिळविलेल्या आयुषनेही दमदार सुरुवात करताना आपल्याच देशाच्या आलाप मिश्राचा 21-13, 21-5 असा पराभव केला. महिला एकेरीत माजी ज्युनियर वर्ल्ड नंबर वन तसनिम मिरने आपल्याच देशाच्या देविका सिहागवर 15-21, 21-18, 22-20 अशी संघर्षपूर्ण लढतीत मात केली.
दुसऱ्या फेरीत भारतीय खेळाडूंतच लढती होणार असून श्रीकांतची लढत आयुषशी, तसनिमची लढत चौथ्या मानांकित जपानच्या तोमोका मियाझाकीशी होईल. मियाझाकी ही 2022 ची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन आहे. मिश्र दुहेरीत बी. सुमीत रे•ाr व एन. सिक्की रे•ाr यांनीही विजयी सलामी दिली असून त्याने मलेशियाच्या पात्रता फेरीतून आलेल्या लू बिंग कुन व हो लो ई यांच्यावर संघर्षपूर्ण लढत देत 24-22, 10-21, 21-13 अशी मात केली. त्यांची पुढील लढत मलेशियाच्याच वाँग तिएन सी व लिम च्यू सिएन यांच्याशी होईल.
भारताच्या अन्य खेळाडूंना मात्र कडव्या आव्हानांना सामोरे जावे लागले. तान्या हिरेमठ, अनुपमा उपाध्याय, इशाराणी बारुआ, चिराग सेन, एस.शंकर मुथुस्वामी सुब्रमण्यम, समीर वर्मा, मिथुन मंजुनाथ यांना पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले. मिश्र दुहेरीत रोहन कपूर व रुत्विका शिवानी ग•s यांनी कडवा संघर्ष केला. पण त्यांना आठव्या मानांकित थायलंडच्या आर. ओउपथाँग व झेनिचा सुदजयप्रपारत यांच्याकडून 21-23. 22-24 असा पराभव पत्करावा लागला.