For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के. कविता यांच्या कारची झडती

05:24 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
के  कविता यांच्या कारची  झडती
Advertisement

तेलंगणा विधानसभा निवडणुकीदरम्यान आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राज्यातील सत्तारुढ भारत राष्ट्र समितीच्या आमदार के. कविता यांच्या कारची रविवारी झडती घेतली आहे. चालू महिन्यात दुसऱ्यांदा कविता यांच्या कारची झडती घेण्यात आली आहे.

Advertisement

बीआरएस नेत्या प्रचारासाठी धर्मपुरीच्या दिशेने जात असताना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी करीमनगरमध्ये चलगल तपासणी नाक्यावर त्यांची कार रोखली. चलगल तपासणी नाक्यावर बीआरएस अमादार कल्वाकुंतला कविता यांच्या कारची झडती घेतल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांच्या कारच्या तपासणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अधिकाऱ्यांची तपासणी पूर्ण झाल्यावर कविता या धर्मपुरीच्या दिशेने रवाना झाल्या.

यापूर्वी 7 नोव्हेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अशाच प्रकारे निजामाबादमध्ये केसीआर यांच्या कन्या कविता यांच्या कारची झडती घेतली होती. यापूर्वी कविता या शनिवारी तेलंगणाच्या इतिक्यालमध्ये प्रचारादरम्यान बेशुद्ध झाल्या होत् या. कविता या पक्षाच्या एका नेत्यासोबत खुल्या वाहनातून मायक्रोफोनच्या माध्यमातून समर्थकांना संबोधित असताना ही घटना घडली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.