For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के.आर. शेट्टी,यू स्टार विजयी

12:01 PM Apr 07, 2026 IST | Tarun Bharat Portal
के आर  शेट्टी यू स्टार विजयी
Advertisement

एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा:किरण तरळेकर,लोहित तम्माण्णाचे सामनावीर

Advertisement

बेळगाव : श्रीरामसेना हिंदुस्थान अनगोळ आयोजित एसआरएस चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ब्ल्यू स्टार संघाने बीसीसी मच्छे संघाचा 15 धावांनी तर के.आर. शेट्टी संघाने वामिका गोकाक संघाचा 6 गड्यांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. लोहित तम्माण्णाचे, किरण तरळेकर यांना सामनावीर तर संतोष एम. विकी सावंत यांना इम्पॅक्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. एसकेई प्लॅटिनम ज्युबिली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ब्लू स्टारने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 141 धावा केल्या.

राजने 2 षटकार, 5 चौकारांसह 41, लोहित तम्माणाचेने 1 षटकार, 2 चौकारासह 25, नमन ओऊळकरने 2 चौकारांसह 15, किरण येळगूकरने 12 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे संतोष एम. ने 23 धावात 2, प्रवीण खराडेने 40 धावात 2, शुभम व आयुष यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्यानंतर बीसीसी मच्छेच्या डावत 20 षटकात 126 धावात आटोपला. साहिल पाटीलने 2 चौकारांसह 27, प्रवीण खराडेने 1 षटकार, 2 चौकारांसह 24 तर संदेश कोक्करने 16 धावा केल्या. ब्ल्यू स्टारतर्फे लोहित तम्माण्णाचेने 35 धावात 4, किशोरने 17 धावात 3 व एबीने 1 गडी बाद केला.

Advertisement

दुसऱ्या सामन्यात वामिका इलेव्हनने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी बाद 130 धावा केल्या. विकीने 1 षटकार, 4 चौकारांसह 56, सुनीलने 2 षटकार, 1 चौकारांसह 24, मयांकराजने 20 धावा केल्या. शेट्टीतर्फे किरणने 14 धावात 4, अक्षयने 23 धावात 2, राहुल शिंदेने 1 गडी बाद केला.प्रत्त्युत्तरादाखल खेळताना 16 षटकात 6 गडी बाद 134 धावा केल्या. माजिदने 2 षटकार, 5 चौकारांसह 50, प्रशांतने 1 षटकार 2 चौकारांसह 24, विशालने 2 षटकारसह 23 धावा केल्या.वामिकातर्फे विकीने 35 धावात 2 तर रवी व अजित यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

Advertisement
Tags :

.