के. आर. शेट्टी लायाज, सिग्नीचर, रॉजर्स संघ विजयी
केएससीए थर्ड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यता प्राप्त धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए थर्ड डिव्हिजन क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून के. आर. शेट्टी लायाज संघाने क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटक संघाचा, रॉजर्स क्रिकेट क्लबने युनियन जिमखानाचा, सिग्नीचर स्पोर्ट्सने चॅलेंजर युथ संघाचा पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. अक्षय जगताप, आशिष मंडोळकर, अमरदीप पाटील यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
युनियन जिमखाना मैदानावरती खेळविण्यात आलेल्या सामन्यात के. आर. शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 27.4 षटकात सर्वगडी बाद 166 धावा केल्या. अनुराग बाजपयीने 54, साहील शर्मा 17, आदी नलवडे 14, शुभम खोत 13, अक्षय जगताप 21 तर सिद्धार्थ अधिकारीने 12 धावा केल्या. क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटकातर्फे नागराज मादारने 11-4, अलंकारने 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना क्रिकेट क्लब ऑफ कर्नाटकाचा डाव 29.2 षटकात 145 धावांत आटोपला. यश विकासने 43, श्रेयेशने 24, किशोर शेट्टीने 23 तर अजयने 13 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे अक्षय जगतापने 5 तर साहील शर्माने 2 गडी बाद केले.
दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 9 गडी बाद 124 धावा केल्या. सुमित भोसलेने 43, मिलिंद चव्हाणने 20, विनीत अडुरकरने 16 तर रोहीतने 10 धावा केल्या. रॉजर्सतर्फे सुनील पाटील 3, आशिष मंडोळकर व शिवानंद पाटीलने प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स क्लबने 23.2 षटकात 6 गडी बाद 127 धावा करुन सामना 4 गड्यांनी जिंकला. आशिष मंडोळकरने 29, विनीत पाटीलने 42, अफरीद 22 तर सुनील पाटीलने 11 धावा केल्या. जिमखानातर्फे रोहीत पोरवालने 2 गडी बाद केले.
तिसऱ्या सामन्यात सिग्नीचरने प्रथम फलंदाजी करताना 30 षटकात 8 गडी बाद 208 धावा केल्या. संतोष चव्हाण 43, अमरदीप पाटील 31, भरत गाडेकर 36 तर रामकृष्णने 15 धावा केल्या. चॅलेंजरतर्फे शुभम चव्हाण 3 तर रणजीत पाटीलने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना चॅलेंजर युथतर्फे 28 षटकात 167 धावांत आटोपला. प्रथमेश लोहारने 46, प्रज्वल जाधवने 21, ओम मातीवड्डरने 33 तर शुभम चव्हाणने 12 धावा केल्या. सिग्नीचरतर्फे अमरदीप पाटीलने हॅट्ट्रीकसह 4 गडी तर नागेश सुतार व भरत गाडेकरने प्रत्येकी 3 गडी बाद केले.