के. आर. शेट्टी लायाजकडे हनुमान चषक
यश चौगुले सामनावीर व स्वयंम खोत मालिकावीरचा मानकरी
बेळगाव : प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी आयोजित हनुमान चषक 14 वर्षांखालील आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी लायाज संघाने रॉजर्स क्रिकेट क्लबचा 20 धावांनी पराभव करुन हनुमान चषक पटकाविला. अष्टपैलु खेळाडू यश चौगुले याला सामनावीर व स्वयम खोत याला मालिकावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. व्हॅक्सीन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात के.आर. शेट्टी लायाज संघाने प्रथम फलंदाजी करताना 24.4 षटकात सर्वगडी बाद 136 धावा केल्या.
त्यात यश चौगुलेने 7 चौकारांसह 62 चेंडूत 72 तर स्वयम खोतने 3 चौकारासह 27 धावा केल्या. रॉजर्सतर्फे अथर्व बेळगावकरने 24 धावांत 3 तर सोहम गावडेने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉजर्स क्रिकेट क्लबचा डाव 23 षटकात सर्व गडी बाद 116 धावांत आटोपला. त्यात प्रसन्ना शानभागने 3 चौकारांसह 32, अवनीश हट्टीकरने 4 चौकारांसह 24, सोहम गावडेने 21 तर जतीन दुर्गाईने 10 धावा केल्या. के.आर. शेट्टी लायाजतर्फे यश चौगुलेने 17 धावांत 3, सोहमने 20 धावांत 2 तर स्वयम खोत, खांडू पाटील, तेजराज पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बेळगाव स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष दीपक पवार, संजय सातेरी, विवेक पाटील, बाळकृष्ण पाटील, सिद्धेश असलकर, बलराम जागृत, निखिल वाघवडेकर, प्रमोद पालेकर, डॉ. वाली, प्रशांत लायंदर आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या के. आर. शेट्टी व उपविजेत्या रॉजर्स संघाला चषक देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट यष्टीरक्षक सचिन तरवार बी. एस. सी., उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वरदराज पाटील (लायाज) उत्कृष्ट गोलंदाज अथर्व बेळगावकर (रॉजर्स), उत्कृष्ट फलंदाज महम्मद हामजा (जिमखाना), अष्टपैलु खेळाडू अवनिश हट्टीकर (रॉजर्स), उकृष्ट संघ प्रमोद पालेकर क्रिकेट अकादमी, मालिकावीर स्वयम खोत (लायाज) यांना चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून जोतिबा पवार, साई कारेकर तर स्कोरर म्हणून प्रमोद जपे यांनी काम पाहिले.