के.आर.शेट्टी किंग्ज, जिमखाना उपांत्य फेरीत
बेळगाव : सिग्नीचर स्पोर्ट्स क्लब आयोजित नरेंद्र कुलकर्णी चषक टी-20 स्पर्धेत के.आर. शेट्टी किंग्जने साईराज वॉरियर्सचा 49 धावांनी तर युनियन जिमखानाने रॉयल चॅलेंजचा 101 धावांनी पराभव करुन उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. सुनील सक्री, वैभव कुरीबागी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेईच्या प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के.आर.शेट्टी प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 गडी बाद 152 धावा केल्या. त्यात प्रशांत लायंदरने 2 षटकार 4 चौकारांसह 41, सुनील सक्रीने 2 षटकार 1 चौकारासह 36 धावा केल्या. साईराज वॉरियर्सतर्फे तनिष्क नाईक व रामनाथ काळे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साईराज वॉरियर्सने 20 षटकात 9 गडी बाद 103 धावा केल्या.
त्यात तनिष्क नाईने 1 षटकार 3 चौकारांसह 32 तर संतोष जाधवने 3 चौकारांसह 20 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे किरण तारळेकर, मिलिंद बेळगावकर व सुनील सक्री यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात युनियन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 223 धावा केल्या. त्यात वैभव कुरीबागीने 1 षटकार 14 चौकारांसह 93 तर रवी पिल्लेने 3 षटकार 6 चौकारांसह 52 धावा केल्या. रॉयल चॅलेंजतर्फे सरफराज शेखने 3 तर मुजिब नालबंदने दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रॉयल संघाचा डाव 17.4 षटकात सर्वगडी बाद 122 धावांत आटोपला. त्यात तारीख अहम्मदने 6 षटकार 3 चौकारांसह 68 धावा केल्या. जिमखानातर्फे संदीप चव्हाण व रवी पिल्ले यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. शनिवारी उपांत्य फेरीचा सामना एसकेई विरुद्ध सिगन क्रिकेट क्लब यांच्यात सकाळी 9 वाजता तर उपांत्य फेरीचा सामना के. आर. शेट्टी विरुद्ध युनियन जिमखाना यांच्यात दुपारी 1 वाजता खेळविण्यात येईल.