नवा पक्ष स्थापण्याची के. कवितांची घोषणा
06:44 AM Jan 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
‘बीआरएस’शी राजकीय नातेसंबंध संपुष्टात
Advertisement
वृत्तसंस्था/ हैदराबाद
माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आणि तेलंगणातील विधान परिषद आमदार के. कविता यांनी सोमवारी स्वत:चा नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याची घोषणा तेलंगणा शहीद स्मारकात केली. कविता ह्या मागील अनेक महिन्यांपासून त्यांच्याच पक्षातील नेत्यांशी दुरावल्या होत्या. आता त्यांनी भारत राष्ट्र समितीपासून (बीआरएस) पूर्णपणे राजकीय संबंध तोडत स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला. हा पैशाचा प्रश्न नाही, हा स्वाभिमानाचा प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात नेहमीच महिला, उपेक्षित आणि दुर्बलांच्या पाठीशी उभी राहण्याचा निर्धारही व्यक्त केला.
Advertisement
Advertisement