For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के. कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला

06:49 AM May 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
के  कविता यांचा जामीन अर्ज फेटाळला
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

बीआरएस नेत्या के. कविता यांना न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. दिल्ली मद्य धोरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बीआरएस नेत्या कविता यांचा जामीन अर्ज राऊस एव्हेन्यू न्यायालयाने सोमवारी फेटाळला. ईडी आणि सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केल्यामुळे कविता यांचा तुरुंगातून बाहेर पडण्याचा प्रयत्न फसला आहे. आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय त्यांच्यासमोर उरला आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्यात ईडीने 100 कोटी ऊपयांच्या व्यवहाराचा आरोप कविता यांच्यावर करण्यात आला आहे. या व्यवहारादरम्यान कविताने 2021 आणि 2022 मध्ये किमान दहा फोन-सीमकार्ड वापरल्याचे स्पष्ट झाले आहे. डिजिटल पुरावे नष्ट करण्यासाठी आणि तपासातील पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचा संशय आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार कविता यांचा या घोटाळ्यात सक्रिय सहभाग असून तिने आपले सहकारी अऊण पिल्लई, बाबू आणि इतरांना लाच देऊन व्यवसाय कसा करायचा हे स्पष्ट केले होते. कविता यांच्याशी आर्थिक व्यवहार करणारे इतर संशयितही सध्या कोठडीत असून त्यांची विविध तपास यंत्रणांकडून आमने-सामने चौकशीही केली जात आहे. ही चौकशी सुरू असतानाच त्यांना जामिनावर बाहेर सोडल्यास मद्य धोरण प्रकरणाच्या संपूर्ण तपासावर परिणाम होऊ शकतो, असा युक्तिवाद तपास यंत्रणांकडून केला जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.