For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

के. कविताच्या जामिनावर उद्या ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी

06:35 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
के  कविताच्या जामिनावर उद्या ‘सर्वोच्च’मध्ये सुनावणी
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

तेलंगणाच्या माजी मुख्यमंत्र्यांची कन्या के. कविता हिच्या जामीन याचिकेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मद्य धोरण प्रकरणी ईडीने कविताला 5 महिन्यांपूर्वी अटक केली होती. यानंतर सीबीआयने 11 एप्रिल रोजी तिचा ताबा घेतला. के कविता हिच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने 12 ऑगस्ट रोजी ईडी आणि सीबीआयकडून उत्तर मागितले होते. आता मंगळवार, 27 ऑगस्ट रोजी न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई आणि न्यायमूर्ती के. व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्मयता आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने 1 जुलै रोजी कविताचा जामीन अर्ज फेटाळला होता.

Advertisement
Advertisement
Tags :

.