के. सी. त्यागी संजदमधून बाहेर
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते आणि प्रवक्ते के. सी. त्यागी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तथापि, औपचारिकरित्या या कारवाईची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आता पक्षाचा त्यांच्याशी कोणताही संबंध राहिलेला नाही, असे संजदचे नेते राजीव रंजन यांनी स्पष्ट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यागी यांच्यासंबंधी संजदमध्ये काही वाद निर्माण झाले होते. त्यामुळे त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल, ही शक्यता निर्माण झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी करणारे पत्र पाठविले होते. पक्ष आपल्यावर जी कारवाई करणार आहे, ती टाळण्यासाठी त्यांनी हे पत्र पाठविले असावे, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. के. सी. त्यागी यांनी आजवर संजदसाठी बरेच महत्वाचे कार्य केले आहे. ते लक्षात घेता त्यांच्यावर थेट कारवाई करण्याचा निर्णय संजदने घेतला आहे. मात्र, आता त्यांच्याशी पक्षाचा संबंध नसल्याचे स्पष्ट केले गेले आहे.