Navratri 2025 Jotiba Dongar: जागर सोहळ्यानिमित्त जोतिबाची राजेशाही महापूजा
चांगभलंच्या अखंड गजरात, गुलाल खोबऱ्याची प्रचंड उधळण करण्यात आली
By : विनोद चिखलकर
जोतिबा डोंगर : दख्खनचा राजा जोतिबा डोंगर येथे श्री जोतिबाचा जागर दख्खनचा राजा जोतिबा डोंगर येथे श्री जोतिबाचा जागर सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाई, चोपडाई, काळभैरव देवाच्या नावानं चांगभलंच्या अखंड गजरात, गुलाल खोबऱ्याची प्रचंड उधळण करण्यात आली.
यावेळी श्रीस महाअभिषेक, महापोषाख व धार्मिक विधी, मंत्र पठण, मानपान सोहळा, धुपारती सोहळा, भजन, कीर्तन करून जागर सोहळा उत्साहात, भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.दख्खनचा राजा जोतिबा डोंगर येथे श्री जोतिबाचा जागर सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जोतिबाच्या नावानं चांगभलं, यमाई, चोपडाई, काळभैरव देवाच्या नावानं चांगभलंच्या अखंड गजरात, गुलाल खोबऱ्याची प्रचंड उधळण करण्यात आली. यावेळी श्रीस महाअभिषेक, महापोषाख व धार्मिक विधी, मंत्र पठण, मानपान सोहळा, धुपारती सोहळा, भजन, कीर्तन करून जागर सोहळा उत्साहात, भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
दख्खनचा राजा जोतिबा डोंगर येथे श्री जोतिबाचा जागर सोहळा लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शारदीय नवरात्र उत्सवात सोमवारी जागरानिमित्त भाविक भक्तांनी गुलाल दवना, कडाकनी, फलहार, तेल, हार, फुले, ऊस वाहण्यासाठी व पूजा अर्चा करून श्रीं चे दर्शन घेण्यासाठी मंदिर परिसरात रांगा लागल्या होत्या.
दरम्यान जोतिबाच्या जागरानिमित्त छत्रपती मालोजीराजे व मधुरीमाराजे यांच्याकडून श्री जोतिबा देवाच्या महापुजेसाठी परंपरेनुसार महापोषाख पुजारी ठाकरे भावकीकडून श्री चरणी अर्पण केला. श्री जोतिबा देवाच्या जागरानिमित्त चार मुक्तीचे प्रतीक म्हणून कमळपुष्पातील दख्खनच्या राजाची राजेशाही रुपातील बैठी सुवर्णालंकारीत महापूजा बांधली होती.
या पुजेसमोर अश्व अर्पण करुन महापूजा बांधण्यात आली. ही महापूजा श्रीचे पुजारी भाऊसो लादे, बाबासो लादे, देवराज बनकर, अंकुश दादर्णे, दगडू भंडारे गणेश झुगर, ओमकार लादे, गणेश दादर्णे, प्रवीण कापरे, गणेश बुणे, अजित भंडारे, उमेश शिंगे, निलेश झुगर, नानासाहेब लादे, प्रकाश सांगळे, हरिदास सातार्डेकर, गजानन लादे, रमेश ठाकरे, महादेव झुगर यांनी बांधली होती.
काळभैरव यमाई चोपडाई महादेव नंदी या देवांची महापूजा केदार चिखलकर, आदीनाथ लादे, सुनिल सांगळे, केदार शिंगे, स्वप्निल दादर्णे, तुषार झुगर, हर्षद बुणे, कैलास ठाकरे, सतीश मिटके, अजित बुणे, सौरभ सांगळे, जयदिप आमाणे सुमित भिवदर्णे रोहन सांगळे यांनी बांधली. दरम्यान पहाटे 3 वाजता घंटानाद करून श्रींचे दरवाजे उघडण्यात आले.
त्यानंतर श्री सह सर्व देव-देवतांची पाद्यपूजा-काकडआरती, महाभिषेक, महापोशाख घालून महापूजा बांधण्यात आली. त्यानंतर धार्मिक विधी व धुपारती करून महानैवेद्य दाखवण्यात आला. दरम्यान दहा वाजता उंट, घोडा, वाजंत्री, श्री चे पुजारी, देवसेवक, हुद्देवाले, ढोली, डवरी, म्हालदार, चोपदार, नवरात्रकरी, ग्रामस्थ, पुजारी ,भक्तगण असा लवाजमा यमाई मंदिराकडे गेला.
तेथे धार्मिक विधी करून हा लवाजमा परत जोतिबा मंदिरात आला. त्यानंतर तोफेची सलामी देऊन हा सोहळा श्रीं च्या मंदिरात नेण्यात आला. त्यानंतर त्रिकाळ आरती केली. नारळ, सीताफळ, खोबरे वाटी, कवडाळ याचे तोरण बांधण्याचा विधी झाला. त्यानंतर फलाहाराची चार ताटे श्रीं ना नैवेद्य दाखवुन मूळमाया यमाई देवीला दाखवण्यात आला. मंदिर रात्रभर सुरू असल्याने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.