ज्योती स्पोर्ट्सच्या खेळाडूंचा मंत्री हेब्बाळकरांकडून सत्कार
बेळगाव : बेंगळूर येथील कंठीरवा मैदानात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेल्या ज्योती अॅथलेटिक स्पोर्ट्स खेळाडूंचा मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडून खास गौरव करण्यात आला. कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मीताई हेबाळकर यांच्या निवासस्थानी ज्योती अथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडू, संचालक, पालक यांनी भेट घेतली. कर्नाटक राज्य अॅथलेटिक असोसिएशनच्यावतीने बेंगळूर येथील कंठीरवा मैदानात घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी केलेल्या ज्योती अॅथलेटिक्स स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंचा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहभागी खेळाडूंना दोन दिवस बेंगळूर येथे असलेल्या लक्ष्मी हेब्बाळकर यांनी विशेष सहकार्य केले. त्यांच्या या सहकार्याबद्दल क्लबचे अध्यक्ष एल. जी. कोलेकर यांनी विशेष आभार मानले. यावेळी क्लबचे सर्व खेळाडू संचालक पालक उपस्थित होते.