सोहमला अटक करण्यास बाल न्यायालयाची मान्यता
पणजी : कुडचडे येथील वासनाकांडप्रकरणी संशयित आरोपी सोहम सुशांत नाईक याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. एका 14 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोहमला अटक करण्यास पणजी येथील बाल न्यायालयाने मान्यता दिली आहे. सोहमला पणजी येथील बाल न्यायालयाकडून शुक्रवारी चार दिवसांची पोलिस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास कुडचडे पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सुपूर्द केल्यानंतर तपासकामाला गती मिळाली आहे. याबाबत कायदेशीर पूर्तता करण्यासाठी न्यायालयाची विशेष परवानगी मिळणे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.पोलिसांनी न्यायालयात पुरावे आणि साक्षी गोळा करण्यासाठी किमान सात दिवस कोठडीची मागणी न्यायालयात केली होती. मात्र संशयित आरोपी सोहम याला बाल न्यायालयाने फक्त चार दिवसांची पोलिस कोठडीत ठेवण्याची मुभा दिली होती. आता अटक करण्यास परवानगी मिळाल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांपुढे जलदगतीने तपासकाम पूर्ण करताना आवश्यक पीडितांच्या जबानी आणि डिजिटल व अन्य पुरावे गोळा करण्यासाठी नव्याने संधी मिळाली आहे.