For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नुसतेच कागद; जाळ्यात अडकले अलगद

06:55 AM Mar 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
नुसतेच कागद  जाळ्यात अडकले अलगद
Advertisement

नोटा दुप्पट करणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या, मुडलगी पोलिसांची कारवाई

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

नोटा दुप्पट करण्याचे सांगून फसवणूक करणाऱ्या एका टोळीला अटक करण्यात आली आहे. शनिवारी दुपारी गोकाक तालुक्यातील हळ्ळूर चेकपोस्टजवळ ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्याजवळून 2 लाख रुपये रोख रक्कम व नोटांच्या आकाराचे 102 कागदी बंडले पोलिसांनी जप्त केली आहेत.

Advertisement

मुडलगीचे पोलीस निरीक्षक वाजिद पटेल, उपनिरीक्षक चंद्रशेखर हेरकल, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बडीगेर, हवालदार सी. एस. कोळवी, एस. एस. वडेयर, एस. एस. तळवार, बी. वाय. मारापूर, अजित आदींचा समावेश असलेल्या पथकाने या टोळीतील चौघा जणांना अटक केली आहे.

जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी ही माहिती दिली आहे. अल्टो कारमधून चौघे जण नोटा दुप्पट करण्याच्या व्यवहारासाठी निघाले होते. यासंबंधीची माहिती मिळताच मुडलगी पोलिसांनी हळ्ळूर चेकपोस्टजवळ कार अडवून तपासणी केली असता मुडलगी, मंटूर, कल्लोळी, हळळूर येथील चौघे जण या कारमध्ये होते.

2 लाख रुपयांच्या खऱ्या नोटांबरोबरच फसवणुकीसाठी वापरण्यात येणारी 102 कागदी नोटांच्या आकाराची बंडले पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये आढळून आली. पोलिसांनी कारसह सर्व साहित्य जप्त केले आहे. त्यांच्यावर भादंवि 420, सहकलम 34 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून फसवणुकीसाठी ते नेमके कोठे जात होते? याची चौकशी करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.