बेंगळुरात कनिष्ठांच्या टेनिस स्पर्धेला प्रारंभ
01:44 AM Aug 30, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, बेंगळूर
Advertisement
कर्नाटक राज्य लॉन टेनिस संघटनेच्या विश्व टेनिस कनिष्ठांच्या जे-30 बेंगळूर स्पर्धेला येथे शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पात्र फेरीचे सामने खेळविले जात आहेत.
पात्र फेरीचे सामने 29 आणि 30 ऑगस्ट रोजी होणार असून 31 ऑगस्टपासून या स्पर्धेतील प्रमुख ड्रॉमधील सामन्यांना प्रारंभ होईल. स्पर्धा आयोजकांनी प्रमुख ड्रॉमध्ये एकूण 24 टेनिसपटुंना थेट प्रवेश दिला आहे. तर पात्र फेरीतून 4 खेळाडुंना तसेच अन्य 4 खेळाडुंना वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार असून एकूण प्रमुख ड्रॉमध्ये 32 टेनिसपटू राहतील. भारताच्या निल केळकर, दक्ष पाटील, माधव दडीच, कबीर परमार, सतीश जिवीत, अर्जुन पुटेगौडा यांना या स्पर्धेसाठी वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात आला आहे.
Advertisement
Advertisement