महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रात्रीच्या कामावेळी कनिष्ठ अभियंत्यांनी सक्तीने हजर राहावे

12:36 PM Dec 06, 2024 IST | Radhika Patil
Junior engineers should be compulsorily present during night work.
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

शहरात नगरोत्थानमधून 100 कोटी रुपयांच्या निधीतून 16 रस्ते करण्यात येत आहेत. या रस्त्याच्या कामांची गुरुवारी प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी अचान क पाहणी केली. ज्या ठिकाणी वाहतूकीमुळे दिवसा काम करता येणे शक्य नाही अशा ठिकाणी रात्रीच्या वेळी काम करा, मात्र यावेळी महापालिकेचे कनिष्ठ अभियंता आणि सल्लागार कंपनीने हजर राहण्याच्या सक्त सुचना प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी दिल्या.

Advertisement

सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तर) मधून शहरात 16 रस्ते मंजूर आहेत. 100 कोटी रुपये खर्च करुन या 16 रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील 12 रस्त्यांची कामे सध्या ठेकेदारामार्फत सुरु करण्यात आली आहेत. या कामाची प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी गुरुवारी दुपारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. लक्षतिर्थ वसाहत, बेलबाग परिसर, जरगनगर या ठिकाणी पाहणी करण्यात आली. यावेळी प्रशासक कार्तिकेयन एस यांनी संबंधीत ठेकेदाराकडून सुरु केलेल्या रस्त्यांच्या कामाची माहिती घेतली. वाहतुकीमुळे ज्या ठिकाणी दिवसा काम करणे शक्य नाही त्या ठिकाणी रात्री काम करण्याच्या सूचना दिल्या. रात्रीची कामे करताना महापालिकेचा कनिष्ठ अभियंता व सल्लागार कपंनीला कामावर हजर राहण्याच्या सक्त सूचना यावेळी दिल्या. तसेच कामाच्या कामाचा दर्जा चांगल्या ठेवावा. लक्षतिर्थ वसाहत येथे पुढील डांबरी रस्ता करताना डांबराची तपासणी करुनच काम सुरु करण्याच्या सूचना शहर अभियंता यांना दिल्या. हि पाहणी करताना रस्त्यांमध्ये काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग आढळून आलेने मुख्य आरोग्य निरिक्षक यांना तातडीने सर्व ठिकाणचा कचरा उठाव करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उप-शहर अभियंता सुरेश पाटील, कनिष्ठ अभियंता निवास पोवार, सागर शिंदे, ठेकेदार मे.एव्हरेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर अॅण्ड डेव्हलपर्स सत्तार मुल्ला, सल्लागार संदीप गुरव अॅन्ड असोसिएटचे प्राजेक्ट मॅनेजर ए.व्ही.कसबेकर आदि उपस्थित होते.

अचानक पाहणी करणार

प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी गुरुवारी पाहणी दरम्यान सुरु असलेल्या प्रत्येक कामावर डांबर तपासणीचे यंत्र उपलब्ध करण्याच्या सुचना ठेकेदारास दिल्या. यापुढे अचानकपणे कधीही कोणत्याही कामाची पाहणी करण्यात येईल. या पाहणीवेळी डांबराची चाचणी घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच सुरु असलेल्या कामामध्ये दर्जा बाबत कोणतीही तडजोड खपवून घेणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणीवेळी कोणताही अधिकारी गैरहजर राहिल्यास त्याच्यावर तसेच सल्लागार कंपनीवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही प्रशासक कार्तिकेयन एस. यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official
Next Article