कनिष्ठांच्या बॅडमिंटन स्पर्धेला प्रारंभ
06:41 AM Aug 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था, पुणे
Advertisement
पुणे जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सुशांत चिपळकट्टी स्मृती कनिष्ठांच्या आंतरराष्ट्रीय ग्रा प्री बॅडमिंटन स्पर्धेला येथे मंगळवारी मोठ्या थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धेमध्ये 9 देशांचे सुमारे 304 बॅडमिंटनपटू सहभागी होत आहेत.
अमेरिका, संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, इंडोनेशिया, थायलंड, नेपाळ, मलेशिया, भूतान आणि यजमान भारत या देशातील स्पर्धक सहभागी झाले आहेत. सदर स्पर्धेत मुलांच्या विभागात आठवा मानांकीत देव रुपारेलिया आणि मुलींच्या विभागात लक्षा राजेश भारताचे प्रतिनिधीत्व करतील. सदर स्पर्धा 30 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी एकूण 15 हजार अमेरिकन डॉलर्सची रक्कम ठेवण्यात आली असून मुले आणि मुलींच्या एकेरीतील विजेत्याला प्रत्येकी 1208 डॉलर्स तर उपविजेत्याला 724 अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस दिले जाणार आहे.
Advertisement
Advertisement