For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऑफिस सुटलं की नदीत उडी

06:46 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
ऑफिस सुटलं की नदीत उडी
Advertisement

स्वीत्झर्लंडची राजधानी बर्नमध्ये आरे नदीच्या काठावर अनोखे दृश्य दिसून येते. ऑफिसमध्ये काम करणारे लोक, विद्यार्थी आणि स्थानिक रहिवासी नदीच्या काठावर उभे राहतात, स्वत:चे कपडे अन् सामग्री एका वॉटरप्रूफ ड्राय बॅगेत ठेवतात आणि त्यानंतर त्या बॅगेला नदीत फेकून त्यामागे स्वत:ही उडी घेतात. नदीच्या प्रवाहासोबत वाहत जातात. हे लोक नदीत पाहण्यासाठी उडी घेत नाहीत, तर आरे नदी घरी पोहोचण्याचा सर्वात सोपा अन् मोफतचा मार्ग आहे.

Advertisement

बर्नमध्ये लोक याला रिव्हर कम्यूट (नदीच्या मार्गाने प्रवास) म्हणतात. परंतु काही लोक उन्हाळ्यात घरी जाण्यासाठी कधीकधी नदीचा वापर करतात. तर अनेक लोकांसाठी हा रोजच्या प्रवासाचा लोकप्रिय हिस्सा असतो. बर्नमध्ये बहुतांश लोकांसाटी आरे नदीत वाहत घरी पोहोचण्यासोबत उन्हाळ्यात थंडावा मिळविण्याची सोपी आणि पसंतीची पद्धत आहे.

आरे नदीचे आकर्षक दृश्य

Advertisement

आरे नदी बर्न शहराच्या जुन्या हिस्स्याच्या चहुबाजूला वाहते. पूल, ऐतिहासिक इमारती आणि नदीच्या काठावर निर्मित उद्यानांमधून जात हे आकर्षक दृश्य दिसते. स्थानिक लोक अनेकदा नदीत वरच्या दिशेने उतरतात आणि प्रवाहासोबत वाहत शहराच्या हिस्स्यामंधून जातात आणि निश्चित स्वीमिंग पॉइंटवर नदीतून बाहेर पडतात. पोहताना लोक स्वत:चे कपडे, फोन आणि मूल्यवान सामग्रीला सुरक्षित ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ बॅगेचा वापर करतात. बर्ननमध्ये आरे बॅग प्रचंड लोकप्रिय आहे. आरे नदीचे पाणी अत्यंत साफ असून याला शहरी क्षेत्रात वाहणाऱ्या जगातील सर्वात स्वच्छ नद्यांमध्ये सामील करण्यात आले आहे.

नदीतून घरी जाणे लोकप्रिय

नदीत वाहत घरी जाणे बर्नमध्ये उन्हाळ्यातील संस्कृतीचा हिस्सा ठरले आहे. हे स्थानिक लोक आणि पर्यटकांना स्वत:कडे आकर्षित करते. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ समोर येतात, ज्यात लोक कामानंतर पूलावरून नदीत उडी घेत मग वाहत जाताना दिसून येतात. परंतु तीव्र प्रवाहाच्यावेळी प्रशासन लोकांना नदीत जाण्यापासून रोखते.

Advertisement
Tags :

.