ज्युडोपटू तुलिका मानचे तात्पुरते निलंबन
06:42 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था
Advertisement
नवी दिल्ली
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेती भारतीय ज्युडोपटू तुलिका मान हिला, ठावठिकाणाबाबत माहिती न दिल्याबद्दल ‘नाडा’ने तात्पुरते निलंबित केले आहे. यामुळे तिला ग्लासगो गेम्समधून माघार घ्यावी लागली असून तिच्यावर दोन वर्षांची संभाव्य बंदी येऊ शकते.
Advertisement
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक विजेती ज्युडोपटू तुलिका मान हिला, गेल्या 12 महिन्यांत तीन वेळा ‘व्हेअरअबाउट्स‘ नियमाचे उल्लंघन केल्याबद्दल राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने तात्पुरते निलंबित केल्यामुळे, सध्या सुरू असलेल्या ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. मानने 2022 च्या स्पर्धेत 78 किलोहून अधिक वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते आणि ग्लासगोमध्येही तिच्याकडून पदकाची प्रबळ अपेक्षा होती.
Advertisement