For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्युडोपटू रोहित मजगुलची राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेसाठी निवड

06:22 AM Feb 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
ज्युडोपटू रोहित मजगुलची राष्ट्रकुल  आशियाई स्पर्धेसाठी निवड
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

येथे झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर गुजरातचा उदयोन्मुख ज्युडोका रोहित मजगुलची (66 किलो) यावर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धा दोन्हीसाठी निवड झाली आहे, रविवारी येथे झालेल्या राष्ट्रीय ज्युडो चाचण्यामंध्ये बेस्ट ऑफ थ्री फायनलमध्ये, मजगुलचा सामना हरियाणाच्या गरवितशी झाला. निर्णायक लढत सुवर्ण स्कोरमध्ये गेली, जिथे मजगुलने एक उत्कृष्ट ओ-गोशी करत वझारी स्कोअर करीत विजय मिळवला, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,

गुजरातमधील गिर सोमनाथ जिल्ह्यातील तलाला या एका लहान आदिवासी गावचा रहिवासी असलेल्या मजगुलचे वर्चस्व अविश्वसनीय आहे. कारण तो गेल्या दोन वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत अपराजित राहिला आहे. यावरून त्याचे सातत्य आणि तांत्रिक प्रभुत्व आणखी सिद्ध झाले आहे. विजयी भारत फाउंडेशनचे समर्पित प्रशिक्षक आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहितचा संयम, कौशल्य  आणि स्पर्धात्मक भावना चमकत आहेत, जे त्याच्या वैयक्तिक उत्कृष्टतेचे आणि फाउंडेशनच्या प्रशिक्षण प्रणालींचे सामर्थ्य दोन्ही प्रतिबिंबित करते. 23 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जुलै 2026 मध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे होणार आहेत, तर आशियाई क्रीडा स्पर्धा 29 सप्टेंबरपासून जपानमधील आइची-नागोया येथे होणार आहेत.

Advertisement

Advertisement

.